social media esakal
पुणे

Diwali Celebration : सोशल मीडियावर दिवाळीचा जल्लोष; रिल्स, व्हिडिओ, संदेशांमुळे रंगत

पणतीचा उजेड अंगणभर पडू दे...लक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊ दे...सौभाग्याचे दीप उजळती...शब्दांची सुमने फुलती...जेव्हा येते दीपावली!

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पणतीचा उजेड अंगणभर पडू दे...लक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊ दे...सौभाग्याचे दीप उजळती...शब्दांची सुमने फुलती...जेव्हा येते दीपावली! दिवाळीच्या निमित्ताने सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनोख्या रिल्स, व्हिडिओ आणि सामाजिक संदेशांद्वारे सोशल मीडियावरही दिवाळी रंगली आहे.

दिवाळी म्हटलं की लखलखणाऱ्या दिव्यांचा प्रकाश, घरोघरी विद्युत रोषणाई, फराळाचा दरवळणारा सुगंध, अंगणात रांगोळी, फुलांची सजावट असे चित्र आपण नेहमीच पाहतो. त्यात आता सोशल मीडियावरही दिवाळी अत्यंत उत्साह व आनंदात साजरी केली जात आहे. विविध सोशल मीडिया व्यासपीठांवर दिवाळीच्या शुभेच्छा, रिल्स, व्हिडिओ आदी टाकले जात आहेत. दरम्यान, नोकरी व शिक्षणाकरिता आपल्या कुटुंबापासून दूर राहणारे दिवाळीनिमित्त घरी जातानाचा आनंद व्‍यक्त करत सध्या व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रॅम आणि फेसबुक स्टोरीज पोस्ट करत आहेत.

सगळीकडे दिवाळीमुळे गर्दी पाहायला मिळत आहे. तर बाजारपेठातील गर्दी, त्यात शहरातील विविध ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, खरेदी, फटाक्यांची आतषबाजी अशा विविध गोष्टींचे अगदी काही सेकंदांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर बाहेर गावी किंवा परदेशात असलेल्या व्यक्तींद्वारे व्हिडिओ कॉल आणि एकमेकांना सोशल मीडियाद्वारेच दिवाळीच्या गोड शुभेच्छा दिल्या जात आहेत.

प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश

सोशल मीडिया ही काळाची गरज बनली असून प्रत्येकजण मनोरंजनाचा साधन म्हणून यावर बराच वेळ घालवत असतात. हा केवळ मनोरंजनाचाच नाही तर, सामाजिक संदेश देण्याचा देखील एक महत्त्वाचा स्रोत म्हणून अलीकडे वापरला जात आहे. त्याच अनुषंगाने सोशल मीडियाचा वापर आता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्याकरिता होत असल्याचे दिसून येत आहे.

रिल्स, शॉर्ट व्हिडिओंच्या माध्यमातून पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश ही दिला जात आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतानाचे रिल्स, विविध प्रकारचे हॅशटॅग देखील सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

आनंदाची दिवाळी...

दिवाळीमध्ये दिवे, विद्युत रोषणाई, फुले, रांगोळी अशा अनेक वस्तू घेतल्या जातात. त्यात रस्त्यावर या गोष्टी विक्री करण्याऱ्या किरकोळ विक्रेत्यांकडून दिवे, पणत्या, आकाशकंदील आदींची खरेदी करत त्यांची दिवाळी आनंदाची व्हावी, असा ही संदेश सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. ‘उठा उठा दिवाळी आली, यांची दिवाळीही आनंदाची करण्याची वेळ झाली’ असे अनोखे कॅप्शन देत छायाचित्र आणि व्हिडिओ टाकले जात आहेत.

खबरदारी घ्या...

दिवाळी आली की फटाक्यांचा दणदणाट देखील सर्वत्र पाहायला मिळतो. बाजारपेठांमध्ये असंख्य प्रकारचे फटाके उपलब्ध असतात. मात्र, फटाक्यांच्या वापरामुळे प्रदूषणात तर भर पडतेच, त्याचबरोबर अनेकदा आगीच्या घटना, किंवा फटाक्यांमुळे अपघाताच्या दुर्घटना देखील मोठ्या प्रमाणात घडतात.

अशाच काही घटनांचा सुद्धा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करत युट्यूब शॉर्ट्स, इन्स्टाग्रॅम व फेसबुक रिल्स, ट्विटर सारख्या सोशल मीडिया व्यासपीठांवर व्हायरल होत आहे. तसेच भान राखून, खबरदारी बाळगत दिवाळी साजरी करण्याचा संदेश ही दिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Political: इम्रान खान यांच्या बहिणीला घरातून ताब्यात घेतले; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात कारवाई

Amravati College Student Case : कॉलेज तरुणीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत ठेवले संबंध, फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; १ लाख ३२ हजार हडपले

Western Vidarbha Crop Damage : पावसाच्या खंडाने पिके संकटात शेतकऱ्यांना भरीव मदतीची ग्वाही; मुदतपूर्व पीक पाहणी पूर्ण करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये गणरायाचे विसर्जन करताना Engineering च्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा कस लागणार; लवलिना-नरेंद्रची थेट उपांत्यपूर्व फेरीत सुरुवात

SCROLL FOR NEXT