NIG26B04249
निघोज (ता. पारनेर) ः संदीप वराळ फाउंडेशनतर्फे गरीब व गरजूंना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले.
वराळ फाउंडेशनकडून अकराशे कुटुंबांना फराळ वाटप
निघोज, ता. ९ ः येथील संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संदीप पाटील वराळ गोरगरिबांची दिवाळी या सामाजिक उपक्रमातून यंदा सुमारे ११०० गरजू कुटुंबांना साडी, मिठाई व श्रीखंडाचे वाटप करण्यात आले. सोमवारी (ता. ९) माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योजक मच्छिंद्र लंके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
माजी सरपंच व पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांनी तेरा वर्षांपूर्वी या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतरही सहकाऱ्यांनी हा सामाजिक उपक्रम अखंडपणे सुरू ठेवला आहे. माजी आमदार गावडे म्हणाले की, वराळ कुटुंबाने गोरगरिबांची जाणीव ठेवून समाजाभिमुख कार्य केले. हाच वारसा पुढील पिढी चालवत आहे. गोरगरिबांच्या घरात दिवाळीचा आनंद निर्माण करण्यासाठी संदीप पाटील यांनी सुरू केलेला उपक्रम सहकाऱ्यांनी आजही सुरू ठेवला आहे. या कार्यामुळे समाजाशी असलेले नाते अधिक दृढ होते.
सचिन वराळ म्हणाले की, कुटुंबातील सदस्यांनी घालून दिलेला जनसेवेचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे. लोकसहभागातून मागील तेरा वर्षे तो राबविला जात आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असून, पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.
श्रीहरी महाराज पवार, नाना ढवळे, शिवाजी डेरे, बबन तनपुरे, दिनेश बाबर, पंकज कारखिले, पत्रकार संजय बारहाते यांनी मनोगत व्यक्त केले. विविध संस्थांचे पदाधिकारी, फाउंडेशनचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. नीलेश घोडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.