पुणे

राहाता - लोणी दिवाळी पहाट बातमी

CD

सतीश वैजापूरकर
राहाता, ता.९।११।२६
------------------
SHD26B06279
लोणी (ता. राहाता) ः दिवाळी पहाट कार्यक्रमात कलाकारांचे स्वागत करताना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील.

सुरेल गीतांनी दिवाळी पहाट प्रसन्न
राहाता, ता. ९ ः सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून लोणी येथे आयोजित ‘दिवाळी पहाट’ या संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील उदयोन्मुख गायकांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून दिवाळीची पहाट प्रसन्न केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मैफलीत ‘केव्हा तरी पहाटे,’ ‘मातीमध्ये दरवळणारे,’ ‘या जगण्यावर शतदा प्रेम करावे,’ ‘रेशमाच्या रेघांनी,’ ‘घेई छंद मकरंद,’ ‘स्वामी कृपा कधी करणार,’ अशा विविध लोकप्रिय नाट्यगीत, भावगीत आणि भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले.
संकेत दरकदार, स्नेहा निर्मळ, दीपक वाघ, दुर्गा आगाशे यांच्यासह ज्येष्ठ गिटार वादक प्रदीप अडवणकर, तबला वादक अनिल डोळे, नकुल भगत, पखवाज वादक हनुमान बैरागी आणि की-बोर्डवर नरेंद्र साळवे या कलाकारांनी रंग भरले. या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गायक आणि वादक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी कलाकारांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. याप्रसंगी ट्रक वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, किसन विखे पाटील, विजय लगड, भारत घोगरे यांच्यासह ग्रामस्थ आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Maharashtra Live News: "उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनील तटकरेंनीच दादांचा घात केला"; रामदास कदमांच्या विधानामुळे महायुतीत खळबळ

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT