PNE26W61572
PNE26W61573
PNE26W61574
PNE26W61575
अहिल्यानगर ः शहरात दिवाळीनिमित्त लक्ष्मीमूर्तीना रंगरंगोटी व पणत्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.
दीपोत्सवाच्या लगबगीस प्रारंभ
पणत्या अन् लक्ष्मी मूर्तींच्या रंगरंगोटीला वेग
अहिल्यानगर, ता. २६ ः दीपोत्सव अर्थातच दिवाळी सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या मांगल्याच्या आणि चैतन्याच्या सणाचे थाटामाटात स्वागत करण्यासाठी अहिल्यानगर शहर आणि परिसरातील मूर्तिकार बांधवांची जोरदार लगबग सुरू झाली आहे. घराघरांत समृद्धी आणणाऱ्या लक्ष्मी मातेच्या सुबक मूर्ती आणि अंगणात तेवणारे पारंपरिक मातीचे दिवे घडवण्यासाठी हे कारागीर रात्रंदिवस घाम गाळत आहेत.
आपल्या अंगभूत कौशल्याने, परंपरेने आणि कलाकुसरीने निर्जीव मातीच्या गोळ्याला अत्यंत देखणे, मोहक व सजीव रूप देण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. सर्वत्र उत्साहाचे आणि लगबगीचे वातावरण पहायला मिळत आहे.
मातीच्या पारंपरिक पणत्या, बोळके, पूजेच्या वाट्या आणि अत्यंत आकर्षक लक्ष्मीमूर्ती घडवण्याचे काम आता पूर्णत्वाकडे जात आहे. तयार झालेल्या या मातीच्या वस्तूंना अखेरचा हात देण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर रंगकाम आणि नक्षीकामाची लगबग सुरू आहे. पारंपरिक डिझाईन्ससोबतच यंदाच्या दिवाळीसाठी ग्राहकांच्या पसंतीस उत्तरतील, अशा काही नावीन्यपूर्ण कलाकृती साकारण्यावर कारागिरांचा विशेष भर दिसत आहे. सण जवळ आल्याने बाजारातील वाढती मागणी वेळेत पूर्ण करण्यासाठी कारागिरांची धावपळ उडाली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी यंदा इको-फ्रेंडली रंगांचा वापर वाढल्याचेही सकारात्मक चित्र या ठिकाणी पहायला मिळत आहे.
-------
इन्फो
लक्ष्मीच्या आकर्षक मूर्ती तयार
दिवाळीत लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण आणि विशेष महत्त्व असते. त्यामुळे बाजारात विविध आकारांतील व रूपांतील लक्ष्मीमूर्तीना ग्राहकांकडून मोठी मागणी असते. यासाठी कारागिरांकडून विविध प्रकारच्या आणि अत्यंत आकर्षक मूर्ती तयार केल्या जात आहेत. मूर्तीचे रंगकाम, डोळ्यांची देखणी व रेखीव रेखाटने, चेहऱ्यावरील हावभाव, पारंपरिक दागिन्यांची मनमोहक सजावट आणि मुकुटाला चंदेरी-सोनेरी रंग देण्याचे अत्यंत नाजूक व बारकाईचे काम सध्या जोमाने सुरू आहे.
----------------
चायनीजला भारी पडतेय पारंपरिक पणती
आजकाल चायनीज दिव्यांची आणि रोषणाईची कितीही भुरळ असली, तरी घराच्या उंबरठ्यावर, तुळशी वृंदावनाजवळ आणि अंगणात मातीची पणती लावण्यालाच खरी आणि पवित्र परंपरा मानली जाते. त्यामुळे कारागिरांकडून हजारो पणत्या तयार करण्याचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे, तसेच या पणत्यांची बाजारात विक्रीसाठी पाठवणी करण्यासाठी सुरक्षित पॅकिंग सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.