फोटोओळी
SLC26B30599
सोलापूर : सावरकर मैदान येथे उभारलेल्या फटाके स्टॉलवर फटाके खरेदी करताना ग्राहक.
PNE26W64684
सोलापूर : ग्रीन फटाक्यांवरील मानांकनाचा लोगो.
कॅंडल, स्काय शॉट अन् पिकॉकची फटाकेबाज रंगत!
ग्रीन फटाकेही बाजारात दाखल; फॅन्सी फटाक्यांना ग्राहकांची पसंती
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके बाजारात ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. यंदा कॅंडल, पिकॉक, स्काय शॉट आणि हातात फिरवता येणारे सुदर्शन चक्र हे फटाके आकर्षण ठरत आहेत. यासोबतच ध्वनी व वायुप्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने तयार केलेले ग्रीन फटाकेही बाजारात दाखल झाले आहेत. फॅन्सी फटाक्यांच्या नव्या प्रकारांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
ग्रीन फटाक्यांची संकल्पना आता बाजारात रुजू लागली आहे. हे फटाके शिवकाशी येथे तयार केले जातात. अन्य उत्पादनांप्रमाणेच फटाक्यांच्या गुणवत्तेसाठीही मानांकनाची संकल्पना पुढे आली आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने तयार केलेल्या या फटाक्यांमुळे ध्वनी आणि हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे त्यांना ग्रीन मानांकन दिले जाते. बाजारात अशा फटाक्यांचे प्रमाण वाढत असले, तरी मानांकन मिळवण्याची खर्चिक प्रक्रिया आणि उत्पादन खर्चामुळे त्यांच्या किमती तुलनेने अधिक आहेत.
यंदा नियमित फटाक्यांसोबतच काही नवे प्रकारही बाजारात आले आहेत. हातात धरून तीन शॉट सोडणारा कॅंडल हा फटाका यंदा प्रथमच उपलब्ध झाला आहे. तसेच हातात फिरवता येणारे सुदर्शन चक्रही ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. यापूर्वी भूईचक्र जमिनीवर फिरवले जात होते. स्काय शॉट, पिकॉक आणि बटरफ्लाय यांसारख्या फॅन्सी फटाक्यांनाही मागणी आहे.
-------------------------------------
PNE26W64680
ग्रीन फटाक्यांची संकल्पना बाजारात रुजू लागली आहे. त्यांची किंमत अधिक असली, तरी प्रदूषण कमी करण्यासाठी ते उपयुक्त आहेत. त्यामुळे ग्राहकांनी अशा फटाक्यांना पसंती द्यावी.
- कृष्णा पैठणकर, फटाके विक्रेता, सोलापूर
-------------------------------
PNE26W64682
यंदा स्काय शॉट हा फटाका विशेष आकर्षण ठरला आहे. फॅन्सी फटाक्यांचे प्रकारही आकर्षक आहेत. त्यात बटरफ्लाय हा फटाका चांगलाच लोकप्रिय झाला आहे.
- अरविंद नंदरगी, फटाकेविक्रेता, सोलापूर
-------------------------------
PNE26W64679
यंदा फटाके विक्रीचा हंगाम चांगला आहे. बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली असून विक्रीलाही वेग आला आहे. काही फटाक्यांच्या किमतीत वाढ झाली आहे.
- राजेश हिरेमठ, फटाके विक्रेता, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.