पुणे

पशूधन- पर्यावरणपुरक दिवाळी

CD

पान १० - ६ साठी
------------------------
निसर्गासह पशुपक्ष्यांची काळजी
-------------------------------
प्राथमिक मदत ही पशुवैद्यकीय तपासणी व उपचारांचा पर्याय नाही. जनावरांमधील श्वसनाचा त्रास, झटके, बेशुद्धपणा, मोठी भाजलेली जागा, डोळ्याची इजा किंवा विषबाधेचा संशय असल्यास विलंब न करता पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
---------------------------------
डॉ. निशा जाधव, डॉ. रवींद्र जाधव
---------------------------
दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि सामाजिक सलोख्याचा सण आहे. मात्र फटाक्यांचा कर्णकर्कश आवाज, धूर, फटाक्यांचे अवशेषांमुळे पाळीव प्राणी, भटकी जनावरे आणि पक्षी यांना आरोग्यविषयक धोके निर्माण होऊ शकतात. पशुकल्याणाच्या दृष्टीने सण साजरा करताना प्रतिबंधात्मक उपाय, लक्षणांची वेळेवर ओळख आणि योग्य पशुवैद्यकीय मदत महत्त्वाची आहे.

फटाके आणि धूर--- प्राण्यांवरील संभाव्य परिणाम
ध्वनिजन्य ताण --- श्वान व मांजरी घाबरणे, थरथरणे, लपणे, अस्वस्थपणे फिरणे, जास्त आवाज करणे किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करणे अशी वर्तणूक दाखवू शकतात.
अपघात व इजा --- घाबरून पळताना रस्ते अपघात, पडणे, वस्तूंवर आदळणे किंवा स्वतःला जखमी करून घेणे, अस्थिभंग होणे इत्यादी व्याधी अपघातामुळे होण्याची शक्यता असते.
श्वसनविषयक त्रास --- फटाक्यांचा धूर व सूक्ष्म कणांमुळे संवेदनशील प्राण्यांमध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा आधीपासून असलेल्या श्वसनविकारांची तीव्रता वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात.
पक्ष्यांवरील परिणाम --- अचानक मोठ्या आवाजामुळे पक्षी घाबरू शकतात.

धोक्याची लक्षणे :
- अचानक भीती, सतत धडपडणे, लपून बसणे, थरथरणे किंवा असामान्य आक्रमकता.
- सतत खोकला, धाप लागणे, वेगाने किंवा कष्टाने श्वास घेणे.
- भाजलेली त्वचा, फोड, रक्तस्राव, डोळे मिटून ठेवणे, डोळ्यातून पाणी येणे किंवा डोळ्याला स्पष्ट इजा दिसणे.
- उलटी, जुलाब, लाळ श्रवणे, अशक्तपणा, कंप किंवा झटके; विशेषतः अज्ञात पदार्थ अथवा फटाक्यांचे अवशेष चाटल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर.
- श्वसनाचा तीव्र त्रास, बेशुद्धपणा, झटके, मोठा रक्तस्राव किंवा डोळ्याला भेदक इजा ही आपत्कालीन चिन्हे आहेत; त्वरित पशुवैद्यकीय मदत घेणे अपेक्षित आहे.

प्रतिबंध आणि नियंत्रणाचे उपाय :
- फटाके शक्यतो टाळावेत किंवा वापर मर्यादित ठेवावा; प्राणी, गोठे, पक्ष्यांची घरटी आणि पशूंच्या निवारा/ आश्रयस्थानांजवळ फटाके फोडू नयेत.
- श्वान, मांजरींना घरातील शांत, हवेशीर आणि सुरक्षित खोलीत ठेवा. खिडक्या-दारे सुरक्षित करा जेणेकरून पाळीव प्राणी पळून जाणार नाहीत, तसेच फटाक्यांच्या आवाजाचा त्रास कमी होईल.
- प्राण्यांना स्वच्छ पाणी व परिचित विश्रांतीची जागा द्या. घाबरलेल्या प्राण्याला ओरडू नका किंवा शिक्षा करू नका; शांतपणे सांभाळा.
- बाहेर फिरणाऱ्या प्राण्यांना दिवाळीच्या काळात शक्यतो घरात किंवा सुरक्षित कुंपणात ठेवा.
- शेतातील जनावरे गोठ्यात सुरक्षित बांधा; दोर, खांब व कुंपणामुळे इजा होणार नाही याची खात्री करा. पुरेशी जागा, पाणी आणि वायुविजन ठेवा.
- फटाक्यांचे अवशेष पूर्ण थंड झाल्यानंतर सुरक्षित साधनांनी गोळा करा. रस्ते, चराईची ठिकाणे, गोठे आणि पाणवठ्यांजवळ कचरा ठेऊ नका, जेणेकरून अपघात टाळता येतील.
--------------
इन्फो ः
प्राथमिक पशुवैद्यकीय मदत ः
भाजणे : प्राण्यांना ज्वलनाच्या स्रोतापासून दूर करा. भाजलेला भाग स्वच्छ, थंड वाहत्या पाण्याखाली सुमारे २० मिनिटे थंड करा. बर्फ, तेल, तूप, टूथपेस्ट किंवा मलम स्वतःहून लावू नका. स्वच्छ, न चिकटणाऱ्या आवरणाने हलके झाकून पशुवैद्यकांकडे उपचारासाठी आपल्या पाळीव प्राण्यास घेऊन जा.

डोळ्याची इजा : डोळा चोळू देऊ नका; अडकलेली वस्तू स्वतः काढू नका. रासायनिक पदार्थ गेल्याचा संशय असल्यास स्वच्छ पाण्याने हळुवारपणे धुवा आणि तातडीने पशुवैद्यकीय तपासणी करून घ्या. डोळ्यात वस्तू घुसली असल्यास धुण्याचा किंवा काढण्याचा प्रयत्न करू नका.

धूर श्वासावाटे जाणे : प्राण्याला धुरापासून दूर, स्वच्छ हवेशीर जागी न्या. धाप लागणे, सतत खोकला, निळसर/फिकट हिरड्या किंवा अशक्तपणा असल्यास तातडीने पशुवैद्यकीय मदत घ्या.

जखम किंवा रक्तस्राव : स्वतःची सुरक्षितता राखून प्राण्याची कमीत कमी हालचाल करावी. स्वच्छ कापडाने रक्तस्रावावर सौम्य दाब द्या आणि त्वरित पशुवैद्यकांकडे न्या. गंभीर जखमेत अनावश्यक हाताळणी टाळा.

विषबाधेचा संशय : पदार्थाचे पाकीट किंवा नमुना सुरक्षितपणे सोबत ठेवा. पशुवैद्यकीय सल्ल्याशिवाय उलटी करवणे, दूध/तेल देणे किंवा मानवी औषधे देणे टाळा.

प्राथमिक मदत ही पशुवैद्यकीय तपासणी व उपचारांचा पर्याय नाही. जनावरांमधील श्वसनाचा त्रास, झटके, बेशुद्धपणा, मोठी भाजलेली जागा, डोळ्याची इजा किंवा विषबाधेचा संशय असल्यास विलंब न करता पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. ध्वनी व प्रदूषणविषयक स्थानिक नियम पाळा आणि शक्यतो फटाकेमुक्त सणाला प्राधान्य द्या. मातीच्या पणत्या स्थिर जागी आणि ज्वलनशील वस्तूंपासून दूर ठेवा तसेच प्राणी व लहान मुले यांचा संपर्क येणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्या.कचऱ्याचे वर्गीकरण करा तसेच फटाक्यांचे अवशेष पाणवठे किंवा चराईच्या जागी टाकू नका. भटक्या किंवा जखमी प्राण्याला सुरक्षित अंतरावरून मदत करा; पकडण्याचा धोका असल्यास स्थानिक पशुवैद्यकीय सेवा किंवा प्राणी कल्याण संस्थेशी संपर्क साधा.
-----------------------------
- डॉ. निशा जाधव, ७०८३११५७४२
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Jogi IAS to Chief Minister : राजीव गांधींच्या एका फोन कॉलवर IAS नोकरी सोडून राजकारणात प्रवेश करणारे अजित जोगी पुढे कसे बनले काँग्रेसचे सर्वात मोठे बंडखोर?

नाहीतर ते आज जिवंत असते... लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या 'त्या' दोन गोष्टी, कसा झालेला त्यांचा मृत्यू?

Pakistan Army: आंदोलनकर्त्यांवर थेट बॉम्ब फेकले! पाककडून आपल्याच जनतेवर भीषण हल्ला; सात जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : "स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही"; माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा स्पष्ट कायदेशीर सल्ला

Digital Payments: ऐन दिवाळीत Google Pay डाऊन? ऑनलाइन पेमेंट करताना अनेकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

SCROLL FOR NEXT