दिवाळीनिमित्त बाजारपेठा गजबजल्या
व्यावसायिकांकडून ग्राहकांसाठी आकर्षक खरेदी योजना
सातारा, ता. २५ : प्रकाशाचा उत्सव असणारी दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणासाठीच्या साहित्याने साताऱ्यातील बाजारपेठ सजण्यास सुरुवात झाली असून, यामुळे सातारकरांना दिवाळीची चाहुल जाणवू लागली आहे.
दिवाळीचा सणाची सज्जता सर्वत्र होऊ लागली आहे. दसऱ्यानंतर प्रत्येक जण दिवाळीच्या सणासाठीच्या तयारीला लागला होता. येणार, येतेय म्हणणारी दिवाळी आता दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे साताऱ्यातील सर्वच प्रकारच्या बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढीस लागली आहे. कपडे बाजारात सद्यःस्थिती मोठ्या प्रमाणात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. येथील दुकानांसह गृहोपयोगी वस्तूंसह, दुचाकी चारचाकी विक्रीच्या ठिकाणी देखील दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. वाहनांची नोंदणी करत दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नवीन वाहने घरी नेण्यास अनेकांचा मानस आहे. दिवाळीत नागरिकांकडून होणाऱ्या खरेदीवर लक्ष ठेवत अनेक व्यावसायिकांनी आकर्षक अशा खरेदी योजना जाहीर केल्या आहेत. यामुळे अशा ठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी जास्तीची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
आकाशकंदील, पणत्या, विद्युतरोषणाईच्या साहित्यांनी साताऱ्याच्या बाजारपेठेतील दुकाने सजण्यास सुरुवात झाली आहे. विविधरंगी आकाशकंदील व झगमगत्या विद्युतरोषणाईमुळे संपूर्ण बाजारपेठ रात्रीच्या वेळेस उजळून निघत आहे. शैक्षणिक वर्षातील पहिल्या सहामाहीचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून, परीक्षा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने साताऱ्यातील बाजारपेठ गर्दीने फुलण्यास सुरुवात होणार आहे.
............
सातारा : आकाशकंदिलांनी सजलेली दुकाने. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा)
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.