पुणे

वाहन खरेदीचा उदंड उत्साह

CD

पिंपरी, ता. ८ : दिवाळीचा मुहूर्त साधत नवीन वाहन घरी घेऊन जाण्यासाठी शहरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. नवीन वाहनांची चौकशी करणे, विविध मॉडेल्सची माहिती घेणे, किंमत आणि वैशिष्ट्यांची तुलना करणे, तसेच वाहनांचे बुकिंग करण्यासाठी ग्राहक शोरूममध्ये येत आहेत.

दिवाळीला सुरुवात झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या दिवशी वाहन, वस्तू खरेदी केली जाते. मुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी शोरूममध्ये रेलचेल असते. दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर सरासरी पाच ते सहा हजार वाहनांची नोंद होते. यंदाही दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवीन वाहन खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक ग्राहकांनी काही दिवसांपूर्वीच वाहनांचे बुकिंग केले आहे. तर काही जण दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये प्रत्यक्ष भेट देत आहेत. दुचाकी वाहनांना ग्राहकांकडून चांगली मागणी असून, बहुतांश कंपन्यांची विविध मॉडेल्सची वाहने शोरूममध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना बुकिंगनंतर लगेच वाहनांचा ताबा दिला जात आहे. मात्र दुसरीकडे, चारचाकी वाहनांच्या काही लोकप्रिय मॉडेलसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने काही वाहनांसाठी एक ते तीन महिन्यांपर्यंत वेटिंग आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावरच वाहन मिळावे, अशी अपेक्षा असलेल्या ग्राहकांना काही मॉडेलच्या बाबतीत प्रतीक्षा करावी लागत आहे. वाहन कंपन्यांकडून दिवाळीनिमित्त आकर्षक सवलती, विशेष ऑफर्स, फायनान्स योजना आणि एक्स्चेंज सुविधाही दिल्या जात आहेत. जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्याकडेही काही ग्राहकांचा कल आहे. वाहनांचे मायलेज, किंमत, इंजिन क्षमता, सुरक्षा सुविधा आणि देखभाल खर्च या बाबींचा विचार करून ग्राहक खरेदीचा निर्णय घेत आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहन बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांकडून विविध कंपन्यांच्या वाहनांची तुलना करून उपलब्ध मॉडेल्सची चौकशी केली जात आहे. मागणीच्या तुलनेत वाहनांचा पुरवठा होत नसल्यामुळे काही वाहनांना तीन ते सहा महिन्यांचे वेटिंग आहे.
- संजय गुरुंग, सीईओ, साईबाबा ऑटोव्हील्स

दिवाळीनिमित्त वाहन खरेदीवर विविध ऑफर देण्यात आलेल्या आहेत. चौकशी आणि माहिती घेण्यासाठी ग्राहक येत आहेत. वाहन विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
- मनीष मोहिते, संचालक, जय माता दी ऑटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Muhurat Trading : दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स-निफ्टी वधारले, अनेक शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा उच्चांक

Eknath Shinde: जालन्यात शिंदेसेनेला मोठं भगदाड! सर्व तालुकाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, कार्यपद्धीवर नाराज

IND U19 vs PAK U19: सेहवाग-द्रविड स्वस्तात बाद, पण अर्जुन राजपूतचं खणखणीत शतक; भारताच्या पाकिस्तानविरुद्ध २०० धावा पार

Latest Marathi News Live Update: : पंतप्रधानांनी बस्तरमधील कोब्रा (CoBRA) ऑपरेशन्स बेसला भेट दिली

Dalit Files Novel by Sharankumar Limbale : ‘दलित फाइल्स’मध्ये जातीय अन्यायाच्या जखमा आणि शिक्षणासाठीचा संघर्ष कसा मांडला?

SCROLL FOR NEXT