pune sakal
पुणे

राज्य बॅंकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

कर्मचाऱ्यांना १२.५० टक्के सानुग्रह अनुदान जाहीर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या व्यवसाय आणि नफ्यात वाढ झाल्यामुळे बॅंक प्रशासनाने कर्मचाऱ्यांना गेल्या १७ वर्षांतील उच्चांकी १२.५० टक्के सानुग्रह अनुदान जाहीर केला आहे. राज्य बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी ही माहिती दिली.

राज्य सहकारी बॅंक ही गेल्या काही वर्षांपासून नफा कमावत असलेली आशिया खंडातील एक अग्रगण्या शिखर बॅंक बनली आहे. रिझर्व्ह बॅंकेचे सर्व निकष पूर्ण करीत सतत ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त केला आहे. त्याचे श्रेय बॅंकेतील कर्मचारी वर्गाला जाते. २०१७-१८ या आर्क्षिक वर्षात प्रति कर्मचारी व्यवसाय २६ कोटींवरून २०२०-२१ मध्ये ५२ कोटी रुपये झाला आहे. ही वाढ लक्षात घेउन प्रशासनाने हे उच्चांकी सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. यापूर्वी बॅंकेने ९ ते १२ टक्के सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.

बॅंकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर २०११ मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार ७०७ इतकी होती. ही संख्या ३० सप्टेंबर २०२१ अखेर ७५९ पर्यंत खाली आली आहे. परंतु बॅंकेच्या व्यवहारात आणि नफ्यात वाढ झाली आहे. बॅंकेचे पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक आणि नागपूर येक्षे प्रशासकीय कार्यालय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अमित शाहांकडे राजीनामा अन् मोदींकडे माफीची मागणी; राहुल गांधींचं खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

प्राजक्ता माळी अन् प्रवीण तरडे यांच्यात टोकाचा वाद आणि गाजलेल्या चित्रपटाचं शूटिंग पडलेलं बंद; काय होतं कारण?

IND vs SL, Test: साई सुदर्शनच्या जागी सरफराजच का? ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होण्यामागचं कारण आलं समोर!

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

Management Admissions: राज्यात बीबीए-बीबीएम-बीएमएस व एकात्मिक एमबीए प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १२ हजार २८२ विद्यार्थ्यांना संधी, ८४८५ जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

SCROLL FOR NEXT