पिंपरी, ता. ७ : उत्सवांमध्ये डीजे आणि लेझर लाइट वापरणाऱ्यावरून वातावरण तापले आहे. त्याचे दुष्परिणामही स्पष्ट झाले आहेत. असे असतानाही ‘केस तर केस, १६ बेस’ अशा ओळी वापरून पोलिसांना आव्हान देणाऱ्या रील्स सांगवीतील एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केल्या आहेत.
शहरात दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून डीजे आणि लेझर लाइटचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. त्यातच आता सांगवीतील एका मंडळाने १६ बेसच्या डीजेचे प्रदर्शन करत, पोलिसांच्या कारवाईला न जुमानणारे डायलॉग्स असलेले व्हिडिओ शेअर केले आहेत. डीजेमुळे आरोग्यावर होणारे परिणाम आणि वाढत्या अपघातांमुळे बंदीची मागणी होत असतानाही, कार्यकर्त्यांकडून कायद्याचा धाक नसल्यासारखे वर्तन होत आहे. केवळ गुन्हे दाखल करण्यापलीकडे कठोर कारवाई होत नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याची टीका होत आहे.
तरुणाईला चिथावणी
‘‘केस तर केस, १६ बेस’’ आणि ‘‘दिल में ना पुलिस का डर हैं और ना ही कानून का खौफ, ये अपने इलाके के बेताज बादशाह हैं’’ अशा आशयाचे व्हिडिओ पोस्ट करून तरुणाईला चिथावणी देण्याचा प्रयत्न या मंडळाकडून केला जात असल्याचे दिसत आहे.
पोलिस काय कारवाई करणार?
या वादग्रस्त आणि आव्हानात्मक पोस्टची दखल आता सायबर सेल आणि स्थानिक सांगवी पोलिस घेणार का, कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या आणि पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या अशा रिल्सवर पिंपरी चिंचवड पोलिस प्रशासन आता काय कडक पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.