PNE26W51206
अहिल्यानगर ः डीजे व ध्वनिवर्धक यंत्रणांवर सरसकट बंदी नको, या मागणीसाठी जिल्ह्यातील साऊंड, लाईट, जनरेटर, असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित उपोषणात सहभागी व्यावसायिक.
सरसकट बंदी नको, नियमांचे बंधन घाला
डीजे व्यावसायिकांचे उपोषण ः परवानगी प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी
अहिल्यानगर, ता. १९ ः डीजे व ध्वनिवर्धक यंत्रणांवर लावण्यात आलेल्या सरसकट बंदीमुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने बंदी घालण्याऐवजी नियम व अटींचे बंधन घालावे, अशी मागणी डीजे व्यावसायिकांनी केली आहे. या मागण्यांसाठी जिल्ह्यातील साऊंड, लाईट, जनरेटर असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनात राहुरी तालुका साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष दीपक साळवे, श्रीगोंद्याचे मंगेश घोडके, पाथर्डीचे नय्युम शेख, शेवगावचे सचिन कराळे, नेवाशाचे प्रशांत मोटे, श्रीरामपूरचे युवराज भागवत, राहात्याचे नितिकेश थेटे यांच्यासह साऊंड, लाईट, जनरेटर असोसिएशनचे पदाधिकारी व व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शासनाने निश्चित केलेल्या ध्वनी मर्यादा आणि वेळेच्या नियमांचे पालन करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. मात्र सर्वच व्यावसायिकांना दोषी ठरवून सरसकट बंदी घालणे अन्यायकारक आहे. डीजे व्यवसायावर चालक, ऑपरेटर, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. बँकांचे कर्ज, वाढते व्याजदर आणि व्यवसायावरील निर्बंध यामुळे अनेक व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
इन्फो
या आहेत मागण्या
डीजे व ध्वनिवर्धक यंत्रणेवरील सरसकट बंदी व अनावश्यक निर्बंध तत्काळ हटवावेत. ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादा व वेळेच्या नियमांमध्ये राहून डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी. परवानगी प्रक्रिया सुलभ, स्पष्ट आणि पारदर्शक करावी. सार्वजनिक मिरवणुका वगळता लग्नसोहळे व इतर शुभकार्यासाठी पोलिस परवानगीची अट शिथिल करावी. डीजे व्यावसायिक, ऑपरेटरवर होणारे हल्ले व अमानुष वागणूक रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.