पुणे

आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाच्या १३८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

CD

आळंदी, ता. १६ : ज्ञानेश्वर विद्यालयातील बालवाडी ते बारावीच्या एकूण १३८ होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी १००० रुपये प्रमाणे ‘सुरेश वडगावकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती’चे वितरण करण्यात आले. या शिष्यवृत्तीची रक्कम ज्ञानेश्वर विद्यालयातील संस्थेचे विश्वस्त, शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी स्वतंत्रपणे दिलेल्या देणगीमधून देण्यात आली. वेदांत सत्संग समितीचे अध्यापक कैलास येवले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या प्रसंगी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व पुणे जिल्हा परिषदचे सदस्य विजयसिंह शिंदे, राज्य शालेय शिक्षण वित्त व नियोजन विभागाचे अधीक्षक कृष्णा ढाळे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड, उपप्राचार्य प्रशांत सोनवणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षकेतर कर्मचारी व पालक आदी उपस्थित होते. योगेश मठपती यांनी सूत्रसंचालन केले. तर, प्रदीप काळे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT