vaccine esakal
पुणे

मासिक पाळी, गर्भवती, स्तनपान आणि लसीकरण; दूर करा गैरसमज

महिलांनो तुम्हाला लसीसंबंधात अनेक प्रश्न असतील तर गोंधळून जाऊ नका

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

पुणे : तुम्ही गर्भवती आहात!, तुमची मासिक पाळी सुरू आहे, तुम्ही बाळाला स्तनपान करत आहात! आणि मग कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची की नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? पण गोंधळून जाऊ नका. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या माजी अध्यक्षा आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आरती निमकर यांनी दिलीत तुमच्या प्रश्नांची उत्तरं, जाणून घ्या.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक नागरिकांना लस देणे गरजेचे असून त्यासाठी शासन, वैद्यकीय यंत्रणा वेगाने पावले उचलत आहे. अशात आता एक मे पासून १८ वर्षांवरील महिलांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे या वयात असणाऱ्या मुली आणि महिलांनी ही लस घ्यावी की नाही, याबाबत असंख्य शंका उपस्थित होत आहे. याबाबत अधिक माहिती स्त्रीरोगतज्ञ डॉ. आरती निमकर यांनी दिली आहे.

गरोदर महिला कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी का?

- नाही. केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ‘गरोदर महिलांनी ही लस घेऊ नये,’ असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे गरोदर महिलांनी ही लस घेऊ नये.

स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घेणे योग्य ठरले का?

- नाही. ‘स्तनपान करणाऱ्या महिलांनी ही लस देऊ नये’ असे केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी ही लस घेऊ नये.

पीसीओडी, ओव्हरी सिस्ट यांसारख्या समस्या असल्यास लस घेणे योग्य आहे का?

- आजकाल अनेक मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये पीसीओडी, ओव्हरी सिस्टच्या समस्या दिसून येतात. या समस्या खूप दिवसांपासून सुरू असतात. त्यामुळे अशा आरोग्य विषयक समस्या असणाऱ्या महिलांनी देखील कोरोना प्रतिबंधक लस घेण्याला हरकत नाही.

मासिक पाळी असताना लस घ्यावी का?

- मासिक पाळी सुरू असताना लस घेण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात लस घेतली तरी चालणार आहे. मात्र, कोणाच्या मनात काही शंका असल्यास एक मानसिक समाधान म्हणून मासिक पाळी येण्यापूर्वी आणि मासिक पाळीच्या पाच दिवसांत ही लस घेणे त्यांनी टाळावे.

गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्यांनी महिलांनी लस घ्यावी का?

- गर्भधारणा होण्यापूर्वी लस घ्यायला काहीच हरकत नाही. परंतु गर्भधारणेची तुमची ट्रिटमेट काय आणि कशाप्रकारे सुरू आहे, त्याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतला आणि त्यानंतर गर्भधारणा राहिल्यास दुसरा डोस घ्यावा का?

- तुम्ही कोरोना प्रतिबंधक लस पहिला डोस घेतला आहे. त्यानंतर पहिला डोस घेतल्यानंतर आणि दुसऱ्या डोस घेण्यापूर्वीच्या कालावधीत तुम्हाला गर्भधारणा झाली असेल, तर तुम्ही दुसरा डोस घेऊ नका.  

गर्भवती महिलांनी यासाठी लस घेऊ नये

‘‘मासिक पाळी असली तरी सुद्धा महिलांनी कोरोनाची लस घेण्यास काही अडचण नाही. गर्भवती महिलांना ही लस घेता येणार नाही. गर्भवती असताना अनेक प्रकारच्या लशी टाळण्यात येतात. कोरोनासाठीच्या या लशीत निष्क्रिय जिवंत विषाणू असल्यामुळे ही लस गर्भवती महिलांना देता येत नाही,’’ अशी माहिती डॉ. राजेश्वरी पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सरकारचा मोठा निर्णय! माजी IPS अधिकाऱ्याकडे मोठी जबाबदारी, शिक्षण क्षेत्रात बजावणार महत्त्वाची भूमिका!

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी पुण्याच्या खाऊ गल्ल्यांना आणलं वठणीवर; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; २.२३ कोटींचा अन्नसाठा जप्त

Satara Gram Panchayat Election : साताऱ्यातील गावपुढाऱ्यांचा हिरमोड! तब्बल 1350 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर; 'या' एका कारणामुळे निवडणुका थेट 2027 मध्येच?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा, भाजपचे मंत्री आमच्या संपर्कात असल्याचे केले वक्तव्य

Cyclone Akvan: ‘अकवन’ चक्रीवादळाचा धोका; आरोग्य यंत्रणा, बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT