राज ठाकरे
राज ठाकरे sakal
पुणे

सोशल मीडियावर राहून कामे करण्यापेक्षा थेट जनतेची कामे करा

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : "सोशल मीडियावर (social media) तुमच्या पोस्टला असलेले लाईक, कंमेंट करणारे लोक तुमचेच असतात. सोशल मीडियावर काम करण्यापेक्षा जास्त वेळ न घालवता थेट नागरिकांच्यात मिसळा. त्यांना किरकोळ समस्या असतात. त्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्या." अशा सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.खडकवासला मतदार संघातील मनसेच्या प्रमुख पदाधिकारी यांच्याशी बुधवारी वडगाव धायरी येथील धायरेश्वर कार्यालयात संध्याकाळी ५:३८ ते ६:११ असा सुमारे ३५ मिनिटे, हास्यविनोद करीत कोणताही बडेजाव न करता संपर्क साधला.

यावेळी खडकवासला मतदार संघातील ७० जण यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणी शहर अथवा वरिष्ठ सर्वजण सभागृहाच्या बाहेर होते. त्यांच्या सोबत फक्त मनसे नेते अनिल शिदोरे व राजेंद्र वागसकर होते. खडकवासला मतदार संघातील शाखा अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, विभाग अध्यक्ष विविध अंगीकृत संघटनचे पदाधिकारी असे उपस्थित होते. दारबंद करून ही चर्चा झाली. आगामी निवडणूकीच्या दृष्टीने आम्हाला नवनिर्माणासाठी नवचैतन्य मिळाले. असे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले.

चौक तेथे झेंडा, पदाधिकाऱ्यांनी घरावर झेंडा लावा. पक्ष संघटन वाढविण्यासाठी सगळ्यांनी मिळून काम करावे. असे सांगत राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, "पक्षाचे पद हे पक्ष व तुमच्यापुरते मर्यादित आहे. तुमच्या पक्षाच्या पदाचा रूबाब गाजवू नका. असे केल्यास तुमचे जवळचे मित्र देखील त्यामुळे दुरावतात. तसेच, कोरोनामुळे महिलांना सतत घरात बसून कंटाळल्या आहेत. त्यांच्यासाठी पाककला, खाद्य महोत्सव असे विविध उपक्रम राबवा.

ठाकरे यांचे आगमन साडेपाच वाजता झाले. फटाके वाजवून स्वागत केले. हॉलच्या दारावर त्यांना खडकवासला महिलाध्यक्षा निकिता विक्रम चाकणकर व त्यांच्या सोबतच्या महिलांनी औक्षण केले. राज ठाकरे यांच्या प्रतिमेची रांगोळी काढली होती. ठाकरे यांच्या सूचनेनुसार सभागृहातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष वसंत मोरे, कैलास दांगट, विजय मते, सचिन पांगरे, सुनील कोरपडे यांनी हार अर्पण केला.

सभागृहात स्टेजवर न बसता दोन माणसांचा असलेल्या सोफ्यावर ठाकरे बसले होते. त्यांच्या शेजारी शिदोरे व वागसकर बसले होते. बरोबर ५:३८ ला संवाद साधण्यास ठाकरे यांनी सुरवात केली. यावेळी मनसेचे निमंत्रित फक्त ७० पदाधिकारी आत उपस्थित होते. सुरवातीला त्यांनी सर्वांना ओळीत बसलेल्या कार्यकर्त्याना जवळ बोलविले. माईकवर संपर्क न साधता राऊंड टेबल प्रमाणे कार्यकर्ते गोल बसवून थेट संवाद साधला.

यावेळी, माजी नगरसेविका भाग्यश्री दांगट, माजी नगरसेविका युगंधरा चाकणकर, महादेव मते, शिवाजी मते नीलेश माझीरे, अतुल मते, सोनाली पोकळे यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बरोबर 6:11ला पदाधिकाऱ्यांशी संवाद संपला. त्यानंतर, आतील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राज यांच्या सोबत सेल्फी फोटो घेतले. त्यानंतर त्यांच्या वाहनांचा ताफा ६:१५ वाजता कार्यालयाबाहेर पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT