pune sakal
पुणे

कर्तव्याचे पालन सचोटीने करा ; कृष्ण प्रकाश

नानवीज पोलिस प्रशिक्षण विद्यालयात दीक्षान्त संचलन

सकाळ वृत्तसेवा

दौंड : ‘‘महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झालेल्या नवप्रविष्ठांनी कर्तव्याचे सचोटीने पालन करून आदरयुक्त भीती निर्माण करावी. निर्दोष व्यक्तीला शिक्षा होणार नाही आणि दोषी सुटणार नाही, याबाबत नेहमी दक्ष राहावे,’’ असे आवाहन पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.नानवीज (ता. दौंड) येथील पोलिस प्रशिक्षण विद्यालयात गुरुवारी ४१व्या प्रशिक्षण सत्राच्या दीक्षान्त संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून मानवंदना स्वीकारल्यानंतर कृष्ण प्रकाश यांनी हे आवाहन केले. विद्यालयाचे प्राचार्य संदीप आटोळे यांनी प्रास्ताविक करून नवप्रविष्ठांना कर्तव्याची शपथ दिली. समादेशक तानाजी चिखले या वेळी उपस्थित होते.

कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘‘खाकी गणवेश आपण स्वेच्छेने निवडलेला आहे, हे नवप्रविष्ठांनी सदैव लक्षात ठेवून जनतेची सेवा करावी. गणवेश हा राष्ट्रसेवा आणि रक्षणासाठी आहे, कोणताही स्वार्थ साधण्यासाठी नाही. प्रत्येक दिवस संघर्षाचा आहे, पण प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडले, तर त्याचे समाधान देखील आहे. कर्तव्य बजावताना मनुष्य जीवन सुंदर करण्याकरिता सतत प्रयत्न करावे.’’जळगाव पोलिस दलाचे सौरभ कोलले यांनी या दिमाखदार संचलनाचे नेतृत्व केले. पोलिस निरीक्षक एस. बी. काळे व हवालदार दत्तात्रेय निकम यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य एच. पी. मुलाणी यांनी आभार मानले.

बीडचा विशाल जगताप अष्टपैलू

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते विशाल जगताप (बीड), श्‍याम माने (नांदेड) व सुनील निकम (सातारा) यांचा गुणानुक्रमे पहिले तीन अष्टपैलू प्रशिक्षणार्थी म्हणून गौरव केला. त्याचबरोबर अकाश बिराजदार (लातूर), महादेव गोयकर (जळगाव), सौरभ कोलले (जळगाव), सुनील चौधरी (गोंदिया) व संदेश बैसाणे ( धुळे) यांना विविध गटांमधील कामगिरीसाठी प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT