पुणे

सिव्हिलच्या डॉ. स्वाती चव्हाण यांना कोठडी

CD

डॉ. स्वाती चव्हाण यांना कोठडी
डॉ. मनिषा जेजुरकर आत्महत्या प्रकरण : दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव
नाशिक, ता. २१ : जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. मनिषा जेजुरकर यांच्या आत्महत्येप्रकरणी संशयित पती व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांच्या अटकेपाठोपाठ जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांनाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयात सोमवारी हजर केले असता, एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून डॉ. स्वाती चव्हाण, डॉ. नीलेश जेजुरकर यांच्या निलंबनाचे प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे.
डॉ. मनिषा जेजुरकर यांनी सहा मार्च रोजी गंगापूर रोड परिसरातील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी रोहिणी वैभव थोरात यांच्या फिर्यादीनुसार, संशयित पती डॉ. नीलेश जेजुरकरविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. जेजुरकर यांना अटक करण्यात आली असून, उद्यापर्यंत (ता. २२) पोलिस कोठडीत आहेत. तर, रविवारी रात्री डॉ. स्वाती चव्हाण यांनाही गंगापूर पोलिसांनी अटक केली असून त्यांनाही न्यायालयाने उद्यापर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. डॉ. मनिषा जेजुरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने डॉ. चव्हाण यांना अटक करण्यात आल्याचे तपास अधिकारी व सहायक पोलिस आयुक्त प्रमोद वाघ यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून डॉ. नीलेश जेजुरकर, डॉ. स्वाती चव्हाण यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT