Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime News : डॉक्टरला स्वर्ग, पुण्य पडले पाच कोटींना ; विविध आमिषे दाखवून पाच जणांकडून फसवणूक

पत्नीशी सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचा फायदा घेत एका डॉक्टरची पाच जणांनी धार्मिक गोष्टी, पुण्य आणि स्वर्ग अशी विविध आमिषे दाखवून तब्बल पाच कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पत्नीशी सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचा फायदा घेत एका डॉक्टरची पाच जणांनी धार्मिक गोष्टी, पुण्य आणि स्वर्ग अशी विविध आमिषे दाखवून तब्बल पाच कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत आरोपींवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी डॉ. अहमदअली इनामअली कुरेशी (वय ६७, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सादिक अब्दुल मजीद शेख, यास्मीन सादिक शेख, एतेशाम सादिक शेख, अम्मार सादिक शेख (सर्व रा. हार्मोनी सोसायटी, कोंढवा बिबवेवाडी रस्ता, गुलटेकडी), राज आढाव ऊर्फ नरसू यांच्या विरुद्ध फसवणूक, अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. १७ ऑक्टोबर २०१८ ते १२ एप्रिल २०२४ दरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अहमदअली कुरेशी हे धार्मिक प्रार्थनेसाठी कोंढवा भागातील प्रार्थनास्थळात गेले होते. त्या वेळी त्यांची सादिक अब्दुल मजीद शेख याच्याशी ओळख झाली. डॉ. कुरेशी यांनी प्रार्थनास्थळासाठी देणगी दिली होती. पुढे आरोपी सादिक आणि कुरेशी यांची ओळख वाढत गेली.

डॉ. कुरेशी यांनी पत्नीशी सुरू असलेला कौटुंबिक वाद सादिक अब्दुल मजीद शेखच्या कानावर घातला. सादिकने कुरेशी यांना सांगितले की, ‘उद्या तुमची पत्नी जर न्यायालयात गेली तर तिला मालमत्तेतील अर्धा वाटा द्यावा लागेल. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, अशी व्यक्ती शोधा की जिच्या नावावर तुम्हाला ही मालमत्ता बक्षीसपत्र करता येईल.’ त्यानुसार डॉ. कुरेशी यांनी त्यांच्या सात मालमत्ता सादिक अब्दुल मजीद शेख याच्या नावावर केल्या. तसेच एकत्र काही प्लॉटसुद्धा खरेदी केले. डॉ. कुरेशी यांनी मागणी केल्यानंतर त्यातील तीन मालमत्ता आरोपी सादिक अब्दुल मजीद शेख याने परत दिल्या. मात्र चार मालमत्ता परत देण्यास नकार दिला.

शेअर बाजारातदेखील गुंतवणूक

सादिक याची मुले यास्मीन सादिक शेख आणि एतेशाम सादिक शेख या दोघांनी डॉ. अहमदअली कुरेशी यांना शेअर बाजाराचे प्रलोभन दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र ट्रेडिंग करत असताना खात्याचे सर्व गोपनीय क्रमांक या दोघांनी आपल्याकडे ठेवले. काही रोकड, सोन्याच्या वस्तू असा पाच कोटी ३७ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज आरोपींनी डॉक्टर कुरेशी यांच्याकडून फसवणूक आणि अपहार करून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT