doctors
doctors sakal
पुणे

डॉक्टर्स फॉर यू संस्थेने दिला बारामतीकरांना मदतीचा हात

- मिलिंद संगई

बारामती: कोरोनाच्या काळात मदतीसाठी हजारो हात पुढे आले. बारामतीकरांच्या मदतीसाठीही सेवाभावी संस्था असलेल्या डॉक्टर्स फॉर यू (Doctors For You)यांनी भरीव मदत गेल्या अनेक दिवसांपासून सुरुच ठेवली आहे.

बारामतीत रॅपिड अँटीजेन टेस्ट(rapid antigen test) आणि लसीकरणासाठी वैद्यकीय क्षेत्राला मदतीचा हात हवा होता. अशा काळात डॉक्टर्स फॉर यू ही संस्था मदतीला धावून आली. जून महिन्यापासून या संस्थेने लसीकरण, तपासणी व डेटा एन्ट्री ऑपरेटर या तीन माध्यमातून बारामतीच्या आरोग्य विभागाला मोलाची मदत केली.

या संस्थेचे अध्यक्ष डॉ. रजत जैन, सचिव साकेत झा, संचालक डॉ. वैशाली रेणू, झायेद शेख यांच्यासह इतरांनीही या कामात सहकार्य केले. आज बारामती पंचक्रोशीतील तब्बल 35 युवकांच्या हाताला या संस्थेने कोरोनाच्या काळात काम दिलेले आहे. एकीकडे बारामतीकरांना विनामूल्य मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले तर दुसरीकडे स्थानिकांच्या हाताला काम देत एक वेगळाच आदर्श या संस्थेने बारामतीत उभा केला आहे.

डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय या सारख्या जागांवर त्यांनी स्वखर्चाने स्थानिकांना रोजगार देत काम देऊ केलेले आहे. बारामतीतील अमेरिका इंडीया फाऊंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या मोड्युलर हॉस्पिटलचे पुढील दीड वर्षांचे कर्मचारी संचालन करण्याची जबाबदारी डॉक्टर्स फॉर यू या संस्थेने स्वखर्चाने उचलली आहे. दहा हजारांवर रॅपिड अँटीजेन टेस्टची किटस त्यांनी बारामतीला देऊ केली.

बारामतीकरांना देणार सीटी स्कॅन

बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात 50 स्लाईसचे आधुनिक सीटी स्कॅन मशीनही डॉक्टर्स फॉर यू या संस्थेच्या वतीने मोफत प्रदान केले जाणार आहे. या सीटी स्कॅनमशीनचा फायदा बारामतीकरांना मोठ्या प्रमाणावर होईल. कोरोनाच्या काळात सीटी स्कॅनचा वापर सर्वाधिक झाला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील सीटी स्कॅनचा लाभ तळागाळातील लोकांना होणार आहे. येत्या आठवडाभरात हे मशीन बारामतीत दाखल होत असून लवकरच ते कार्यान्वित होईल.

उपमुख्यमंत्र्यांनीही केल कौतुक

डॉक्टर्स फॉर यू या संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कौतुक केले. बारामती परिसरात त्यांनी लसीकरण, तपासणी व इतर बाबतीत जी मदत सातत्याने देऊ केलेली आहे त्या बद्दल पवार यांनी या संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT