1puneuniversity_6.jpg
1puneuniversity_6.jpg 
पुणे

पुणे विद्यापीठातील माहितीपट आंतराष्ट्रीय महोत्सवात पहिला

सकाळवृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (इएमएमआरसी) तयार केलेल्या “देवराई: पर्यावरणाचा सांस्कृतिक वारसा” या डॉक्युमेन्ट्रीला 'कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशिया' या संस्थेने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय एशियन स्पर्धेमध्ये एज्युकेशनल टिव्ही प्रोग्राम आणि डॉक्युमेन्ट्री विभागात पहिले पारितोषिक मिळाले.

एज्युकेशनल मिडिया फेस्टिव्हल फॉर कॉमनवेल्थ अशिया हा महोत्सव 8 आणि ९ जानेवारी २०१९ ला दिल्ली येथे पार पडला. ही स्पर्धा एकूण तीन विभागाअंतर्गत घेण्यात आली होती. विद्यापीठाच्या इएमएमआरसी विभागाने “देवराई” या विषयावर डॉक्युमेन्ट्री तयार केली आहे. यामध्ये पुणे परिसर आणि कोकणामधील देवरायांचा अभ्यास करून तिथे चित्रिकरण केले आहे.

शासकीय पातळीवर तसेच सेवाभावी संस्था (एनजीओ) आणि स्थानिक लोकांनी पुढाकार घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी नवीन वनरायांची निर्मिती करून त्याचं संवर्धन करावे या हेतूने या डॉक्युमेन्ट्रीची निर्मिती केली आहे.
  
इएमएमआरसी विभागाकडून देवराई या डॉक्युमेन्ट्रीसाठी लेखन आणि दिग्दर्शन मिलिंद पाटील यांनी केले आहे. तर निर्माता म्हणून विवेक नाबर यांनी काम पहिले आहे. त्यासाठी अधिष्ठाता आणि इएमएमआरसी च विभागप्रमुख डॉ. अरविंद शाळीग्राम यांचे मार्गदर्शन लाभले. कॅमेऱ्याची जबाबदारी इरफान कार्नाळकर आणि वसिम पठाण यांनी घेतली होती. ग्राफिक्स साठी विनोद काळगी आणि अमृता घोडे तर ध्वनी राम जाधव, आणि सहाय्यक म्हणून सिलास काकडे आणि सिल्वराज पिल्ले यांनी काम पहिले. या डॉक्युमेन्ट्री साठी महाराष्ट्र वृक्ष संवर्धनी, देवराई अभ्यासक डॉ. उमेश मुंडले, दिलीप कुलकर्णी आणि यांचेही योगदान लाभले, अशी माहिती डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT