leopard. 
पुणे

कुत्र्याचा पाठलाग करणारा बिबट्या पडला विहिरीत (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

मंचर (पुणे) : कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्याने पाठलाग सुरू केला होता; पण कुत्र्याने विहिरीजवळून चकवा दिल्याने विहिरीत बिबट्या पडल्याची घटना मंगळवारी (ता. 20) पहाटे घडली. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे 

पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे शेतकरी महेंद्र दामोदर पोखरकर यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थ व वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी सुखरूपपणे बाहेर काढले. चांडोली खुर्द, पिंपळगाव, निरगुडसर, अवसरी खुर्द परिसरात गेले पंधरा दिवस या बिबट्याने अनेक मेंढ्या व कुत्र्यांचा फडशा पाडला होता. संकरित गाईवरही त्याने हल्ले केले होते. त्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली होती. मंचरच्या पूर्वेला पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात महेंद्र पोखरकर यांची विहीर आहे. विहिरीमध्ये वीस ते पंचवीस फूट पाणी आहे. 

ग्रामस्थ हेमंत पोखरकर व रामनाथ बांगर यांनी विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती मंचर परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल प्रज्योत पालवे व वन कर्मचाऱ्यांना दिली. विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती. बिबट्या पाण्यात पोहून थकला होता. त्यामुळे त्याने विहिरीतील कपारीत व लोखंडी गजावर काही वेळ विश्रांती घेतली. 

घटनास्थळी सकाळी आठ वाजता बिबट्याला पकडणारे वनखात्याचे पथक विहिरीजवळ आले. त्यांनी विहिरीची पाहणी केली. विहिरीमध्ये पिंजरा सोडला. सुरवातीला बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता; पण कर्मचारी व नागरिकांनी विहिरीत सोडलेला पिंजरा बिबट्याजवळ ठेवला. एक तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याने पिंजऱ्यामध्ये प्रवेश केला. हे पाहून नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. दोराच्या साहाय्याने विहिरीतून बिबट्या सुखरूपपणे बाहेर काढल्यानंतर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. बिबट्याला माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात प्राथमिक उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे, असे पालवे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT