Court-Family
Court-Family 
पुणे

#श्‍वानप्रेम : चक्क 'टॉमी'साठी नाकारली पोटगी

सकाळ वृत्तसेवा
पती देणार श्‍वानाच्या देखभालीसाठी दरमहा 10 हजार रुपये
पुणे - पाळीव प्राण्यांवरील प्रेमापोटी त्यांच्या वाढदिवसापासून अंत्यविधी केल्याचे अनेक प्रकार आपण पाहिले आहेत. मात्र, एक अनोखा प्रकार येथील कौटुंबिक न्यायालयात घडला. घटस्फोट घेऊन विभक्त होताना पतीने नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी पाळलेल्या श्‍वानासाठी दरमहा दहा हजार रुपये देखभाल खर्च देण्यास मान्यता दिली. तसेच, पत्नीनेही पोटगी नाकारली.

अभिजित आणि करिष्माचा (बदललेली नावे) 2011 मध्ये प्रेमविवाह झाला होता. दोघेही उच्चशिक्षित आहेत. अभिजित व्यवसाय करत असून, करिष्मा गृहिणी होती. दोघेही 2012 पासून टॉमीचा (श्‍वानाचे बदललेले नाव) सांभाळ करीत होते. दरम्यान, त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद झाल्याने करिष्माने डिसेंबर 2018 मध्ये घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला. टॉमीला सांभाळण्यासाठी एकरकमी पाच लाखांची मागणी केली होती. मात्र, पतीने दरमहा रक्कम देण्याचे कबूल केले. दरम्यान, हे प्रकरण समुपदेशनासाठी आल्यानंतर त्यांच्यात चर्चा झाली. त्या वेळी त्यांना वाद न करता पुन्हा एकत्र येण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मात्र, अभिजितला व्यवसायासाठी मुंबईला जायचे होते. दोघांनाही सोबत राहणे शक्‍य नसल्याने त्यांनी संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. तसेच, टॉमीची गैरसोय होणार नाही याचाही समुपदेशनात विचार झाला.

दरम्यान, पतीने दिलेल्या पैशांतून पत्नीने टॉमीची योग्य ती देखभाल करावी, पत्नी परदेशात गेल्यानंतर टॉमीला पतीने सांभाळायचे, तो आजारी पडल्यानंतर दोघांनी त्याची काळजी घ्यायची, तसेच महिन्याच्या सात तारखेच्या आत अभिजितने करिष्माच्या खात्यावर पैसे भरायचे, अशी तडजोड केली. करिष्माने स्वतःच्या देखभालीसाठी पोटगीचा अधिकार सोडून केवळ टॉमीसाठी देखभाल खर्च घेण्यास ती तयार झाली.

दोघेही कमावते आहेत, त्यामुळे ते स्वतःची काळजी घेऊ शकतात. मात्र, श्‍वानाचे काय होणार, याची जाणीव त्यांना करून दिली. त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून अभिजित देखभाल खर्च देण्यास तयार झाला. तसेच, करिष्मा सध्या कमावती असल्याने तिने स्वतःहून पोटगीचा अधिकार सोडला.
- समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय

मित्र म्हणून संपर्कात राहू शकतो पण...
सततच्या वादामुळे मी तीन वर्षांपासून स्वतंत्र राहत आहे, त्यामुळे यापुढे आम्ही मित्र म्हणून संपर्कात राहू; पण पती-पत्नी म्हणून बरोबर राहणे शक्‍य नाही, त्यामुळे संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
- करिष्मा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT