The dog trapped in a cement net was finally rescued by firefighters In pune 
पुणे

पुण्यात सिमेंटच्या जाळीत अडकलेले कुत्र्याचे तोंड; 15 मिनिटांत अग्निशामकच्या जवानांनी केली सुटका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : इमारतीच्या जिन्यातील सिमेंटच्या जाळीत श्वानाचे तोंड अडकल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. श्वानाने प्रयत्न करुनही त्याला स्वत:ची सुटका करता आली नाही. अखेर जगण्यासाठी सुरु असलेली त्याची धडपड पाहुन रहिवाशांनी अग्निशामक दलास खबर दिली. त्यानंतर अवघ्या 15 मिनींटातच जवानांनी त्याची सुटका केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवी पेठेतील रत्नदीप सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील जिन्यात असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या जाळीदार भिंतीत एक श्वान अडकल्याची खबर मंगळवारी सकाळी आठ वाजता अग्निशामक दलास मिळाली. त्यानंतर काही वेळातच एरंडवणा अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. 

श्वानाचे तोंड सिमेंटच्या जाळीत अडकले होते. त्यामुळे जवानानी  यंत्राच्या सहाय्याने अतिशय काळजीपूर्वक सिमेंटची जाळी कापली. त्यानंतर श्वानाची सुखरूप सुटका केली. एरंडवणा अग्निशामक दलाचे प्रमुख राजेश जगताप, जवान कार्ले, अमोल शिंदे, सागर सोनवणे, जितेंद्र कुंभार, सचिन वाघोले, शैलेश दवणे, आनंद कांबळे यांच्या पथकाने पंधरा मिनिटात श्वानाची सुटका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT