पुणे

टीचभर पोटासाठी नाचतो डोंबारी; जगण्यासाठी रोजचा संघर्ष!

सुषमा पाटील.

रामवाडी : शिक्षण, विकास आणि आधुनिकतेचा स्पर्श न झालेला हा कोल्हाटी समाज रस्त्याच्या कडेला पारंपरिक डोंबारी कला सादर करत नाच व खेळ याचा सुरेख संगम साधत टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी लोकांसमोर कला सादर करून मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाह करीत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक केलेले निर्बंध प्रशासनाने काही प्रमाणात शिथिल केल्याने उपजीविके साठी अनेकजण घराबाहेर पडू लागले आहेत. आनंदपार्क वडगावशेरी चौकात रस्त्याच्या कडेला डोंबार्‍याचा खेळ दाखवून येणार्‍या जाणार्‍याचे लक्ष वेधून घेत आहे 7 वर्षीची चिमुरडी प्रज्ञा नट (मूळचे छत्तीसगढ). जमिनी पासून सहा ते सात फुटाच्या अंतरावर बांधलेल्या जाड रस्सी वरुन जेव्हा डोक्यावर पितळी कलश, हातात जाड बांबूची काठी आणि त्याच क्षणी पायाने सायकलचे चाक चालवतना पाहून बघणारे थक्क झाले आहेत. कधी परात पायाच्या अंगठ्यात पकडून रस्सीच्या एका टोकापासुन दुसर्‍या टोकापर्यंत चालताना पाहुन खाली पडेल की काय या भीतीने येणार्‍या जाणार्‍याच्या हृदयाची धडधड वाढते.

उद्याची चिंता न करता घाम गाळून कला दाखवत लोकांचे मनोरंजन करून त्यांच्या कडून मिळालेल्या पैशातून भाकरीचा चंद्र त्यांच्या ताटात दिसतो. तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसुन येते. कोरोनामुळे घरबसल्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण सगळीकडे सुरू आहेत. त्याच समाजात शिक्षणा पासुन वंचित असणारा हा कोल्हाटी समाजाची ही चिमुरडी आपल्या कुटुंबासमवेत ऊन, वारा, पाऊसची तमा न बाळगता रस्त्यावर कला दाखवत चौकाचौकात फिरत आहे. ना यांना राहणार्‍यांसाठी पक्की घरे, मुलांसाठी मोफत शिक्षण आणि सरकारी सुविधांचा अभाव अविकासाच्या दारिद्र्यात लोटलेल्या जमाती पुढे आज ही जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT