domestic violence family dispute Court orders husband not to evict wife from home till final decision sakal
पुणे

पत्नीला बेघर करण्याच्या पतीच्या प्रयत्नांना न्यायालयाने लावला ब्रेक...

अंतिम निर्णय होईपर्यंत पत्नीला घराबाहेर न काढण्याचा न्यायालयाचा पतीला आदेश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीला घरातून काढण्याची नोटीस पाठवून दिला बेघर करण्याच्या पतीच्या प्रयत्नांना न्यायालयाने ब्रेक लावला आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणाचा (domestic violence) अंतिम निर्णय होईपर्यंत पत्नीला घरातून बाहेर न काढण्याचा अंतरिम आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांनी पतीला दिला आहे. कौटुंबिक कायद्यानुसार न्यायालयाने संबंधित महिलेला घरातून काढू नये, असा आदेश दिला आहे. त्यामुळे ती बेघर होण्यापासून वाचली. या बाबत सविस्तर माहिती अशी की, व्यावसायिक पती आणि गृहिणी असलेल्या पत्नीत कौटुंबिक कलहातून वाद निर्माण झाले आहे.

त्यातून पत्नीने पत्नीला थेट घर सोडण्याची नोटीस बजावली. पत्नी ही बहिणीच्या कंपनीने दिलेल्या घरात राहत आहे, असे त्या नोटीसमध्ये नमूद आहे. पत्नी गृहिणी असून त्यांच्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही. आर्थिक आधार नसल्याने त्यामुळे मुलीसह राहायचे कुठे, जगायचे कसे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी ॲड. राणी सोनवणे यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली. या जोडप्याला १४ आणि ४ वर्षाची अशा दोन मुली आहेत. घरातून काढू नये आणि इतर हक्कासाठी पत्नीच्यावतीने ॲड. सोनावणे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने या प्रकरणी पतीला समन्स बजावले. मात्र, पती न्यायालयात हजर झालाच नाही. त्यामुळे न्यायालयाने पत्नीला घरातून काढू नये, असा आदेश पतीला दिला.

कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ हा महिलांच्या संरक्षणासाठी तयार केला आहे. या कायद्यामुळे संरक्षणाबरोबरच पोटगी आणि इतर हक्क मिळत असतात. या कायद्यानुसारच एक विवाहिता बेघर होण्यापासून वाचली. कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणाचा अंतिम निकाल होर्इपर्यंत तिला संरक्षण मिळाले आहे.

- ॲड. राणी सोनवणे, विवाहितेच्या वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

SCROLL FOR NEXT