Pune Railway Police Sakal
पुणे

पुणे लोहमार्ग पोलिस विभागाने घडविले दातृत्व

कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन विविध समाजघटक आरोग्य व जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी धावून येत असताना आता सरकारी यंत्रणा देखील पुढे सरसावल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन विविध समाजघटक आरोग्य व जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी धावून येत असताना आता सरकारी यंत्रणा देखील पुढे सरसावल्या आहेत. पुणे लोहमार्ग पोलिस विभागाने त्यांच्याकडील ऑक्सिजन व अन्य अत्यावश्‍यक वैद्यकीय साहित्य पुण्यासह ४ जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त पोलिसांच्या उपचारासाठी देण्याचे दातृत्व दाखवून दिले आहे.

पुणे, नगर, सोलापुर व सांगली या जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये स्थानिक पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. त्यांच्यावर उपचार करताना जिल्हा व आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. बहुतांश ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर व अन्य वैद्यकीय साहित्य अपुरे पडत आहे.

कोरोनापासून पोलिस अधिकारी व कर्मचारी वर्गाचा बचाव व्हावा, यासाठी पुणे लोहमार्ग पोलिस दलाचे अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्या पुढाकारातून चार जिल्ह्यातील पोलिसांसाठी प्राथमिक आरोग्य सुविधा व साधने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार, पुणे लोहमार्ग पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयास काही साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे.

पुणे लोहमार्ग पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात ऑक्‍सिजन कंनस्ट्रेट, वोझोन जनरेटर, बीपी ऐप डिजिटल बफर, ग्लूकोमीटर, डिजिटल वेट मशिन, गरम व थंड पिण्याच्या पाण्याचे मशिन असे साहित्य खरेदी केले होते. हे साहित्य पुणे लोहमार्ग पोलिसांनी पुणे, नगर, सांगली व सोलापूर या ४ जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्याने आरोग्य यंत्रणाकडे असलेली साधने आता अपुरी पडत आहेत. त्यामुळेच आम्ही आरोग्य यंत्रणेला आवश्‍यक वैद्यकीय साहित्य देत आहोत. त्या-त्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. अन्य सरकारी विभागानेही असा मदतीचा हात देण्याची आता गरज आहे.

- सदानंद वायसे पाटील, पोलिस अधीक्षक, पुणे लोहमार्ग पोलिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराला ICC कडून शिक्षा! शफाली वर्माला सेंडऑफ देणं पडलं महागात

अशोक सराफ की निवेदिता सराफ? भांडण झालं तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? अभिनेत्री म्हणाल्या- आम्ही...

Mangalwedha News : धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी ठोस कारवाई करा; धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

Marathi News Live Updates: इंद्रायणी घाटावर तृतीयपंथीयांच्या दोन गटात मारामारी; गुन्हा दाखल

Thane News : सण उत्सवात ध्वनीप्रदुषण व अश्लीतेला थारा नको; डॉ. महेश बेडेकर यांचे राज्यातील नागरिकांना खुले पत्र

SCROLL FOR NEXT