Corona 
पुणे

कोरोनावर खाजगी रुग्णालयात उपचार घेताय, मग पैशांची चिंता सोडाच

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर ता. १०- जिल्हा परीषदेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही नोंदणीकृत खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणार असाल अथवा यापूर्वी कोणी घेतला असेल तर बिलाच्या रकमेवरुन अजीबात घाबरुन जाऊ नका अथवा काळजी ही करु नका. कारण जिल्हा परीषदेच्या कार्यक्षेत्रामधील कोणत्याही नोंदणीकृत खाजगी रुग्णालयात स्वखर्चाने उपचार घेतलेल्या व यापुढील काळात उपचार घेणाऱ्या रुग्णांना डॉ. रखमाबाई राऊत योजने अंतर्गत जिल्हा परीषद स्वनिधीमधून पन्नास हजारापासून एक लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य देणार आहे. 

चिनी अ‍ॅपची अमेरिकेत क्रेझ कमीच
डॉ. रखमाबाई राऊत योजने अंतर्गत जिल्हा परीषद स्वनिधीमधून पन्नास हजारापासून एक लाखांपर्यंत अर्थसहाय्य देणार असल्याच्या वृत्तास जिल्हा परीषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दुजोरा दिला आहे. वरील योजनेचा लाभ घेताना, रुग्णांने महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, धर्मादाय आयुक्तांकडील मदत योजना अथवा इतर कोणत्याही वैयक्तिक लाभांच्या योजनेचा ( वैयक्तिक आरोग्य विमा योजना) लाभ घेतला नसावा ही प्रमुख अट घालण्यात आल्याची माहिती डॉ. भगवान पवार यांनी सकाळ, शी बोलतांना दिली आहे. 

दरम्यान मागील अडीच महिन्याच्या काळात नोंदणीकृत खाजगी रुग्णालयात स्वखर्चाने उपचार घेतलेल्या जिल्हातील सर्वच कोरोना बाधीत रुग्णांचे विहीत नमुण्यातील प्रस्ताव, पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाच्या वरीष्ठ कार्यालयास तात्काळ सादर करावेत असें लेखी आदेश डॉ. भगवान पवार यांनी एका पत्राद्वारे दिले आहेत. 

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. भगवान पवार म्हणाले, राज्य शासनाने सर्वच कोरोना बाधित रुग्णांच्यावर मोफत उपचार व्हावेत यासाठी, कोरोनांच्या रुग्णांवरील उपचाराचा समावेश महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत केलेला आहे. यामुळे बहुतांश कोरोना बाधीत रुग्णांच्यावर वरील दोन्ही योजनेतून मोफत उपचार झालेले आहेत. तर वरील दोन्ही योजनेत न बसलेल्या काही कोरोना बाधित रुग्णांना धर्मादाय आयुक्तांकडील मदत योजनेतून मदत मिळालेली आहे. तर कांही रुग्णांची वैयक्तिक आरोग्य विमा योजनेतून खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेले आहेत. मात्र काही नागरीकांनी मात्र स्वखर्चातून अनेकांनी उपचार केले आहेत. अशा स्वखर्चातून उपचार घेतलेल्या नागरीकांच्या मदतीसाठी जिल्हा परीषदेने स्वनिधीतून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

नेपाळची हिंमत वाढतेय; भारताविरोधात उचललं आणखी एक पाऊल
डॉ. भगवान पवार पुढे म्हणाले, डॉ. रखमाबाई राऊत योजने अंतर्गत कोरोना संशयीत रूग्ण म्हणून उपचार घेतल्यास जिल्हा परीषदेकडून ५ हजार रुपये तर विलगीकरण केलेल्या बाधीतासाठी ५० हजार रुपये जिल्हा परीषद देणार आहे. तर रुग्णांचे आय सी यू मध्ये उपचार घेतल्यास तब्बल ७५ हजार रुपये तर व्हेंटीलेटरवर उपचार घेतलेल्या रुग्णांकरीता १ लाख रुपये देण्याचा निर्णय जिल्हा परीषदेने घेतला आहे. वरील योजनेच्या लाभासाठी लाभार्थी हा जिल्हयातील रहीवासी असावा व उपचार घेतलेल्या रुग्णालयाची नोंदनी ही बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत जिल्हा परीषदेकडे केलेली असावी एवढ्याच अटी घातलेल्या आहेत.

दरम्यान खाजगी रुग्यालयात स्वखर्चाने उपचार घेतलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन, वरील योजनेसाठी नोंदनी करावी असे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT