Dr. Tanaji Sawant sakal
पुणे

Covid JN1 : 'जेएन- १’ला घाबरू नका, सतर्क रहा' - आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी केले आहे.

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज - राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी केले आहे. ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा आज आढावा घेतला. त्यानंतर, कात्रज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सावंत म्हणाले, 'कोविड अनुरूप वर्तणुकीचे काटेकोर पालन करावे. ‘जेएन-१’ साठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्यात येतील. संशियित रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात येतील. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर रुग्णालयांतील यंत्रणेचे गांभीर्याने मॉकड्रिल करून तीन दिवसांत याविषयीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.'

‘जेएन-१’ हा व्हेरियंट धोकादायक नसला तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांमध्ये अफवा पसरून भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी जिल्हा स्तरापासून घेण्यात येईल.

हलगर्जीपणा न करता आरोग्य यंत्रणा, विलागीकरण कक्ष, ऑक्सिजनची सुविधा, अतिदक्षता विभाग, व्हेंटीलेटर आणि महत्त्वाची उपकरणे कार्यरत आहेत, की नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन तपासणी करावी आणि त्याबाबतचे व्हिडिओ तयार करून राज्य स्तरावरील वरिष्ठांना पाठवावेत. प्रत्येक जिल्ह्यात संशयित रुग्णांच्या चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असून चाचणी, सर्वेक्षण आणि उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, अशा सूचना प्रशासनाला दिल्याचे सावंत यांनी सांगितले.

नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरू नये यासाठी माध्यमांना माहिती देण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यामार्फतच अधिकृत माहिती देण्यात येईल. तसेच, या सर्वांच्या नियंत्रणासाठी टास्क फोर्सचीही निर्मीती करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT