Coronavirus 
पुणे

#WeCareForPune अफवांवर विश्वास ठेवू नये ः डॉ. गायकवाड

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘कोरोना’वरून काही अज्ञातांकडून अफवा पसरविल्या जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड यांनी केले. खोटे वृत्त प्रसिद्ध करणाऱ्यांवरदेखील गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिला आहे.

ग्रामपंचायत हॉलमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने खासगी डॉक्‍टर, ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांची बैठक घेण्यात आली. कोरोनाशी संबंधित लक्षणांची माहिती देऊन शंका वाटल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ. गायकवाड यांनी केले. डॉक्‍टरांनी ‘कोरोना’शी लढण्यासाठी एकत्र काम करण्याचे आश्वासन दिले. 

‘टीव्ही न्यूज चॅनेल’च्या बातम्यांमधून फोटो घेऊन त्यामध्ये वाघोलीतील ‘कोरोना’चा रुग्ण असल्याचे एडिट करून तो फोटो सोशल मीडियावर पसरविण्यात आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. वाघोलीतील एका महाविद्यालयातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचीही अफवा पसरली होती. अशा अफवांवरुन पोलिस निरीक्षक मानकर यांनी गंभीर इशारा दिला. अशा प्रकारे चुकीचे संदेश पाठवू नयेत. तसेच समाजभान ठेवण्याचेही आवाहन त्यांनी या वेळी केले. 

परदेशातून आलेल्यांची माहिती कळवा
परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये ‘कोरोना’चे रुग्ण सर्वाधिक आहेत. वाघोली परिसरात परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कळवावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. या व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नसली तरीदेखील, आरोग्य विभाग त्यांची तपासणी करून त्यांच्यावर १४ दिवस लक्ष ठेवणार आहे जेणेकरून पुढील प्रादुर्भाव वाढणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT