Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation sakal
पुणे

नदीसह नैसर्गिक स्त्रोतांमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन नको - महापालिकेचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३०३ ठिकाणी कृत्रिम हौद, लोखंडी टाक्या विसर्जनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

पुणे - गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरात कृत्रिम हौदांची सोय केली आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन नदी आणि नैसर्गिक स्त्रोतांमध्ये न करता पर्यायी मार्गाचा अवलंब करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३०३ ठिकाणी कृत्रिम हौद, लोखंडी टाक्या विसर्जनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती, क्षेत्रीय कार्यालय आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या मुख्य विभागामार्फत एकूण २०३ फिरते हौद उपलब्ध करून देण्यात आले आहेत. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २१६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र आणि मूर्ती दान केंद्र उभारण्यात आले आहेत. तसेच, कृत्रिम हौद आणि मूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली आहे. महापालिकेमार्फत उभारलेल्या सर्व यंत्रणांची माहिती www.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शाडूच्या मातीचा पुनर्वापर

महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत पुनरावर्तन उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘स्वच्छ’ पुणे सेवा सहकारी संस्था आणि इतर स्वयंसेवी संस्थांमार्फत गणेश विसर्जनानंतर शाडूची माती संकलित करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. शाडू मातीचा पुनर्वापर केल्यास मूर्तिकारांना मूर्ती किंवा माती परत देऊन त्यांना मदत करता येऊ शकते. याबाबतची सविस्तर माहिती www.punravartan.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

निर्माल्यांमध्ये प्लॅस्टिक नको

निर्माल्यांमध्ये केवळ हार, पाने आणि फुले एवढ्याच गोष्टींचा समावेश असतो. त्यामध्ये प्लॅस्टिक, थर्माकोल, कापडी वस्तू किंवा फोटो यांचे अवशेष आणि कुठले खाद्यपदार्थ टाकू नयेत. कमिन्स इंडिया, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. हे खत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT