Mobile esakal
पुणे

Mobile : मोबाईल हरविल्यास चिंता सोडा! असा मिळवा तुमचा मोबाईल

दैनंदिन जीवनात अत्यावश्यक झालेला मोबाईल हरवला किंवा गहाळ झाला, तर आता पोलिस ठाण्यात हेलपाटे मारण्याची गरज नाही.

मंगेश कोळपकर

पुणे - दैनंदिन जीवनात अत्यावश्यक झालेला मोबाईल हरवला किंवा गहाळ झाला, तर आता पोलिस ठाण्यात हेलपाटे मारण्याची गरज नाही. कारण केंद्र सरकारच्या एका संकेतस्थळावर हरवलेल्या मोबाईलचा ‘आयएमईआय’ क्रमांक टाकला की, त्या तक्रारीवर केंद्र सरकारच्या यंत्रणा काम सुरू करतात अन् माग लागला की संबंधित नागरिक राहत असलेल्या पोलिस ठाण्यात त्याचे तपशील पाठविले जातात.

त्या माध्यमातून तक्रारदाराला त्याचा मोबाईल सहज मिळू शकतो. या पद्धतीने एक वर्षात सर्वाधिक कर्नाटकमध्ये ३५ हजार ९४५ मोबाईल, तर, तेलंगणामध्ये ३० हजार ४९ मोबाईल नागरिकांना परत मिळाले आहेत. या क्रमवारीत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर असून, एक वर्षात राज्यातील १५ हजार ४२६ नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळाले आहेत.

काय आहे व्यवस्था

केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर’ www.ceri.gov.in हे संकेतस्थळ गेल्या वर्षी १७ मे रोजी सुरू झाले. या संकेतस्थळावरून नागरिकांना त्यांचे गहाळ झालेले मोबाईल संच सहजरीत्या परत मिळण्याची व्यवस्था आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील सी-डॉटने याबाबतची प्रणाली विकसित केली आहे. देशात कर्नाटकमध्ये २०२२ मध्ये सुरुवातीला हा पथदर्शी प्रकल्प सुरू झाला. तो यशस्वी झाल्यामुळे केंद्र सरकारने संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.

अशी आहे पद्धत

१ मोबाईल गहाळ झाल्यावर नागरिकांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार द्यायची. त्याच्या आधारे त्यांना गहाळ झालेल्या मोबाईल संचातील सीम कार्डचे डुप्लिकेट सीम मोबाईल कंपनीकडून मिळते. ते ॲक्टिव्हेट झाल्यावर खात्रीसाठी त्यावर ओटीपी येतो. त्याच्या आधारे www.ceri.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवताना गहाळ झालेल्या मोबाईल संचाचा आयएमईआय क्रमांक नोंदविला जातो.

२ गहाळ झालेल्या मोबाईलचा वापर कुठे सुरू झाल्यास त्याचे नोटिफिकेशन तक्रार केलेल्या संकेतस्थळावर येते. सर्व्हरद्वारे त्या मोबाईलचे तपशील तक्रारदार राहत असलेल्या पोलिस ठाण्यात पाठविले जातात. तसेच त्याबाबत ज्याचा मोबाईल गहाळ झाला आहे, त्यांनाही कळविले जाते.

३ आपल्या नजीकच्या पोलिस ठाण्यात आलेल्या तपशीलाच्या आधारे पोलिसांच्या मदतीने गहाळ झालेला किंवा हरविलेला मोबाईल परत मिळू शकतो.

४ गहाळ झालेल्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक कायमस्वरूपी ब्लॉक करण्याचाही ‘ऑप्शन’ या संकेतस्थळावर नागरिकांना उपलब्ध आहे.

मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या www.ceri.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून नागरिकांना सहजपणे मोबाईल उपलब्ध होऊ शकतो. तेलंगणात आम्ही पोलिस ठाणे स्तरावर पोलिसांना प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे आलेल्या तपशीलाच्या आधारे नागरिकांना त्यांचा मोबाईल परत देण्यास सहज शक्य होते.

- महेश भागवत, अतिरिक्त पोलिस महासंचालक, रेल्वे आणि रस्ते सुरक्षा, तेलंगणा

मोबाईलचा आयएमईआय क्रमांक नागरिकांनी नोंदवून ठेवला पहिजे. मोबाईल संच हरविल्यास केंद्र सरकारच्या संकेतस्थळामुळे तो मिळणे आता सुलभ झाले आहे. तसेच cybercrime.gov.in या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर मोबाईल चोरीची तसेच कोणत्याही सायबर गुन्ह्याची तक्रार देणे शक्य आहे. त्यावरून कायदेशीर कारवाईही होते.

- डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड

मोबाईल मिळण्याचे प्रमाण

  • www.ceri.gov.in संकेतस्थळ कार्यान्वित होऊन एक वर्ष

  • ९ लाख ३२ हजार ०६५ - वर्षभरात देशातील नागरिकांना परत मिळालेले मोबाईल

  • १६ लाख ५६ हजार ८४३ - कायमस्वरूपी ब्लॉक केलेले मोबाईल

  • सुमारे ५ हजार - महाराष्ट्रात दररोज गहाळ होणारे मोबाईल

(हा अंदाज ‘महासायबर’ विभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ची भारतीय T20 संघात थाटात एन्ट्री! सचिन तेंडुलकरचा ३८ वर्षे जूना विक्रम मोडला जाणार

Investment: गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी SIF ठरणार गेमचेंजर?

अख्खा खांब अंगावर पडला... 'उधे गं अंबे'च्या सेटवर मयुरी कापडणेचा झालेला अपघात; म्हणाली, 'कुणी माझं कानातलं काढत होतं...'

Marriage Numerology : मुलीच्या लग्नासाठी मुलगा बघताय? 'या' मुलांकाचे लोक बनतात परफेक्ट जावई, सगळ्यांचे मन जिंकतात

India T20I Squad for England Tour: अक्षर पटेलची उपकर्णधारपदावरून हाकलपट्टी, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूकडे सोपवली जबबादारी

SCROLL FOR NEXT