pune zp 
पुणे

पुण्यातील या ठिकाणांमध्ये "डोअर टू डोअर व्हिजिट' 

नितीन बारवकर

शिरूर (पुणे) : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील "कंटेन्मेंट झोन'मधील गावांत अंगणवाडी ताई, आशा वर्कर्स व शिक्षकांमार्फत "डोअर टू डोअर व्हिजिट' देऊन सर्वेक्षण केले जात आहे. "सस्पेक्‍टेड' क्षेत्रात वारंवार भेटी देऊन वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने ही महत्त्वपूर्ण मोहिम हाती घेतली असून, जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा या मोहिमेत सहभागी होणार आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज (ता. 5) शिरूरमध्ये ही माहिती दिली. तालुक्‍यातील शिक्रापूर, सणसवाडी या गावांना भेटी दिल्यानंतर शिरूरमध्ये सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. तहसीलदार लैला शेख, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पाटील यावेळी उपस्थित होते. शिरूर तालुक्‍यातील कोरोनाविषयक स्थितीचा आढावाही प्रसाद यांनी घेतला. 
जिल्ह्यातील 72 गावे "कंटेन्मेंट झोन' म्हणून जाहीर झाली असून, हवेली तालुक्‍यात सर्वाधिक 13; तर शिरूर तालुक्‍यातील एका गावाचा समावेश आहे. या परिसरावर जिल्हा परिषदेने लक्ष केंद्रित केले असल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले. 

अशी राबविणार मोहीम 
- थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्‍सिमिटरद्वारे नोंदी 
- "सस्पेक्‍टेड' परिसराला वारंवार भेटी 
- लक्षणे आढळणाऱ्यांची वेळोवळी तपासणी 
- कोरोनाचा प्रभाव असेपर्यंत सर्वेक्षण 

मान्सूनपूर्व कामे, खरीप हंगामाचा आढावा, बियाणांची उपलब्धता, दुष्काळी कामे या आघाडीवरही जिल्हा परिषदेचे नियोजन चालू आहे. तरीही सर्व खात्यांचा, विभागांचा समन्वय साधून कोरोनाबाबतच्या उपाययोजनांना अधिक प्राधान्य दिले आहे. 
- आयुष प्रसाद
मुख्य कार्यकारी अधिकारी  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT