पुणे

हुंड्यासाठी महिलेचा छळ करून अघोरी कृत्य

CD

पुणे, ता. १३ ः हुंड्यासाठी महिलेचा छळ करून तिला भोंदू व्यक्तीकडे नेऊन अघोरी कृत्य करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने, तसेच पतीला ‘मंगळ ग्रहाची बाधा’ असल्याचे सांगून घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी एका महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रदीप मनोहर पाटील (वय ३२), मालन मनोहर पाटील (वय ५२), प्रतीक्षा मनोहर पाटील (वय २७, तिघे रा. सरोळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), प्रीतम मनीष पाटील (वय ३०) आणि मनीष पाटील (दोघे रा. नांदेड सिटी, सिंहगड रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा विवाह ठरल्यानंतर आरोपींनी १५ लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली होती. महिलेच्या वडिलांनी विवाह ठरल्यानंतर आरोपींना ऑनलाइन पद्धतीने दोन लाख २० हजार रुपये दिले होते. मात्र, उर्वरित हुंड्याची रक्कम न दिल्याने विवाहानंतर महिलेचा शारीरिक, मानसिक छळ सुरू करण्यात आला. पतीचा मंगळ दोष हटविण्याच्या नावाखाली फिर्यादी महिलेला भोंदूकडे नेऊन अघोरी कृत्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. हुंड्यासाठी छळ आणि अघोरी कृत्यांचा दबाव टाकल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल जगताप करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Marathi News Live Updates : डल्लुपुरा येथील धर्मशिला हॉस्पिटलजवळील गोदामाला आग

Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT