पुणे

गर्भवती विवाहितेची आत्महत्या; पती, सासऱ्याला अटक

CD

वडापुरी, ता. ४ :  हुंड्याच्या छळाला कंटाळून साडेपाच महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी पती व सासऱ्याला अटक केली आहे. याप्रकरणी सासूसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही घटना गुरुवारी (ता. ३) वडापुरी येथे घडली. सोनाली समाधान चंदनशिवे (वय २१) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
याबाबत सोनालीचे वडील हनुमंत श्रीपती बनसोडे (वय ४५, रा. कन्हेरगाव, ता. माढा) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, सोनाली हिचे लग्न २३ नोव्हेंबर २०२५ला वडापुरी येथील समाधान ऊर्फ कार्तिक गौतम चंदनशिवे याच्याशी झाले होते. लग्नात ठरलेल्या एक लाख रुपयांच्या हुंड्याची रक्कम पूर्ण करता आली नव्हती. लग्नानंतर काही दिवस व्यवस्थित नांदवल्यानंतर सासू पार्वती शिवीगाळ व मारहाण करू लागली, तर पती समाधान चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असे. सासरा गौतम चंदनशिवे हादेखील घालून पाडून बोलत असे. या त्रासामुळे सोनालीला तीन ते चार वेळा माहेरी न्यावे लागले होते. गुरुवारी दुपारी जावई समाधानने दूरध्वनी करून, "सोनाली कसेतरीच करतेय, लवकर या," असे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी तिला इंदापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केल्याचे कळवले. तेथे पोहोचल्यावर सोनालीचा मृतदेह आढळला. तिच्या गळ्यावर वळ होता. पती, सासू व सासऱ्याने हुंड्यासाठी केलेल्या शारीरिक व मानसिक छळामुळेच तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपी पती व सासऱ्यास अटक केली असून, अधिक तपास करत आहोत, अशी माहिती पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली.

तणाव आणि घराची मोडतोड
सोनालीच्या मृत्यूनंतर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत इंदापूर पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी जमल्याने तणावाचे वातावरण होते. या घटनेनंतर संतप्त झालेल्या सोनालीच्या माहेरच्या लोकांनी वडापुरी येथे जाऊन आरोपी गौतम चंदनशिवे यांच्या घराची मोडतोड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी 7 जणांना अटक

Hingoli News : मनोज जरांगे पाटील यांची आमदार राजू नवघरे यांनी घेतली भेट; उपोषणस्थळी जाऊन तब्येतीची केली विचारपूस

Pune Fraud News : हेलो, मी प्रिन्सिका जोशी बोलतेय....; मुलीच्या नावाने ‘स्नॅपचॅट’वर मैत्री अन्‌ दीड लाखाच्‍या 'क्रिप्टोकरन्सी'ला गंडा

अमली पदार्थांची टीप दिल्याच्या संशयातून नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; ७ आरोपी अटकेत, ५० हजारांची घेतली होती ‘सुपारी’

Pune News : विद्यानंद बापट यांच्‍यावर हल्‍ला प्रकरणातील आरोपी संतोष चव्‍हाणला एक दिवसाची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT