घोसपुरीमध्ये डॉ. आंबेडकर
जयंती महोत्सवाचे आयोजन
अहिल्यानगर, ता. २८ ः घोसपुरी ग्रामस्थांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन, संविधानकर्ते युवा प्रतिष्ठान यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात विविध वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे महापुरुषांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुवारी (ता. ३०) सकाळी दहा वाजता ‘बुद्धवंदना’ने होणार आहे. सकाळी १० ते ११ या वेळेत धम्मदेशना, धम्मपूजन, ध्वजारोहण असे कार्यक्रम होणार आहे. दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी आठ ते नऊ या वेळेत ‘समाज प्रबोधन विचारमंथन’ या कार्यक्रमांतर्गत शिवव्याख्याते अभय जावळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रात्री दहा वाजता गायिका कडुबाई खरात व त्यांच्या टीमकडून भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.