पुणे

Video : 'संभाजी'वरून डॉ. अमोल कोल्हे यांचे वक्तव्य; म्हणाले...

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेसंदर्भात अर्जुन खोतकर यांनी विधान केले होते. त्यावर आता डॉ. अमोल कोल्हे यांनी विधान केले. ते म्हणाले, गेली अडीच वर्षे ही मालिका सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे.

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका शेवटच्या टप्प्यावर आहे. असे असतानाच अर्जुन खोतकर यांनी मालिकेत शेवटचे काही भाग प्रेक्षकांना दाखविण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे. या मालिकेमध्ये संभाजी महाराजांना औरंगाजेबाने कैद केल्याचे दाखवण्यात येत आहे. त्यानंतरची दृश्यं पाहणे पटणारे नाही. मालिकेतील चित्रीकरण रोखता येईल काय, याबद्दल निर्माते तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले.

त्यावर डॉ. कोल्हे म्हणाले, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे. मात्र, मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT