Pune-Municipal 
पुणे

पुण्याच्या आरोग्य प्रमुखपदी डॉ. आशिष भारती यांची नियुक्ती

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांची बदली होऊन चार तासही झाले नाहीत; तेच राज्य सरकारने नवे आरोग्य प्रमुख म्हणून डॉ. आशिष भारती यांची नियुक्ती केली आहे. सध्या डॉ. भारती यांच्याकडे राज्याच्या आरोग्य खात्याच्या सहायक संचालकपदाची जबाबदारी आहे. या पदावरून डॉ. भारती यांची महापालिकेत एक वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली असून, पुढच्या दोन दिवसांत ते नवा पदभार स्वीकारणार आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेतील आरोग्य प्रमुखपदावर डॉ. हंकारे यांची 25 सप्टेंबर 2018 मध्ये प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली होती. ती पुढच्या दोन वर्षांसाठी असल्याचे राज्य सरकारने आदेशात स्पष्ट केले होते. त्यानुसार डॉ. हंकारे यांच्या प्रतिनियुक्तीची मुदत नुकतीच संपली होती. तत्पूर्वी त्यांना मुदतवाढ देण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या पातळीवर सुरू होत्या. मात्र, डॉ. हंकारे यांची बुधवारी अचानक बदली झाली. तसा आदेशही राज्य सरकारने केला. त्यानंतर लगेचच डॉ. भारती यांच्या नियुक्तीचाही आदेश राज्य सरकारने काढला. 

कोरोनाच्या साथी आरोग्य खात्याकडील ताण पाहता, महापालिकेत दोन आरोग्य प्रमुख नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आधीचे प्रमुख डॉ. हंकारे यांच्या दिमतीला राज्य सरकारमधील डॉ. नितीन बिलोलीकर यांची नेमणूक केली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून दुसरे आरोग्यप्रमुख डॉ. बिलोलीकर काम पाहत आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर 15 दिवसांत त्यांना कोरोनाची लागण झाली. तेव्हापासून ते वैद्यकीय रजेवर आले आहेत. याच काळात डॉ. हंकारेही आजार असल्याने सुट्टीवर होते. त्यामुळे काही दिवस आरोग्य प्रमुखाची जबाबदारी डॉ. अंजली साबणे यांच्याकडे होती. मात्र, डॉ. बिलोलीकर यांची अजूनही सुट्टीच आहे; तर हंकारे यांची मुदत संपल्याने नव्या आरोग्य प्रमुखाच्या नेमणुकीची उत्सुकता होती. त्यात डॉ. भारती यांची नेमणूक केली आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT