Dr Bhushan Patwardhan resignation from post of NAAC president Sakal
पुणे

Dr. Bhushan Patwardhan : डॉ. भूषण पटवर्धन यांचा 'नॅक' अध्यक्षपदाचा राजीनामा?

डॉ. पटवर्धन यांनी वर्षभरापूर्वीच हा कार्यभार स्वीकारला होता

संतोष शाळिग्राम

पुणे : देशातील शैक्षणिक संस्थाचा दर्जा निश्चित करून त्यांना मानांकन देणाऱ्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषदेच्या (नॅक) कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे.

डॉ. पटवर्धन यांनी वर्षभरापूर्वीच हा कार्यभार स्वीकारला होता. तेथील कामकाज समजून घेत असताना तेथील कारभारामधील अनागोंदी, गैरप्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी 'नॅक' समितीच्या राष्ट्रीय स्तरावरील चौकशीची मागणी केली होती.

तसेच 'नॅक'च्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. 'नॅक'च्या कारभाराबाबत असंख्य तक्रारींचा आढावा घेतल्यानंतर कारभार सुधारण्यासाठी त्यांनी पाऊले उचलली. परंतु त्याकडे 'नॅक'मधील यंत्रणांकडून दुर्लक्ष करण्यात आले होते.

'नॅक'मधील या गैरप्रकारांबद्दल त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षांना पत्र पाठवले. त्यात सर्व प्रकारांचा उल्लेख त्यांनी केला आणि राजीनामा देण्यासंबंधी विनंती केली. आयोगाने त्यांची ही विनंती मान्य केली असून, डॉ. भूषण पटवर्धन यांनी आता नॅक अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. डॉ. पटवर्धन यांच्याशी 'सकाळ'ने संपर्क साधला असता, त्यांनी आयोगाला सविस्तर पत्र पाठविल्याचे सांगितले. मात्र, आतातरी या विषयावर काही बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT