Ram Nath Kovind sakal
पुणे

Ram Nath Kovind : नम्रता अन् प्रामाणिकपणा विकसित करावा,­कोविंद ; डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात पदवी प्रदान

‘‘पदवी समारंभ हा मैलाचा दगड जरी असला तरी हा शिक्षणाचा शेवट नाही, ती सतत चालणारी प्रक्रिया आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘‘पदवी समारंभ हा मैलाचा दगड जरी असला तरी हा शिक्षणाचा शेवट नाही, ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी सहानुभूती, नम्रता आणि प्रामाणिकपणा विकसित केला पाहिजे, हीच यशाची गुरुकिल्ली असेल,’’ असे मत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी (ता. १३) व्यक्त केले.

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सभागृहात १५ वा पदवीप्रदान सोहळा कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र- कुलगुरू डॉ. स्मिता जाधव, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील उपस्थित होते.

कोविंद म्हणाले,‘‘भविष्यातील शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा विचार करावा. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी भरपूर परिश्रम करावेत तसेच २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी सर्व क्षेत्राच्या प्रगतीबरोबर विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोडीने अग्रेसर राहण्याचा संकल्प केला पाहिजे.’’

सोमनाथ एस. म्हणाले,‘‘मला मिळालेली पदवी केवळ माझी नसून, इस्रोमध्ये काम करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांची आहे. अलीकडच्या काळात भारताने अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. भारत ‘अमृत काल’ साध्य करण्यापासून फार दूर नाही कारण आपण प्रत्येक गोष्टीची रचना, विकास आणि अंमलबजावणी करत आहोत.’’

डॉ. मुजुमदार यांनी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यात शिक्षकांच्या भूमिकेबाबत कौतुक केले. विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या २१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित केले. विविध विद्याशाखेतील ५३२६ स्नातकांना पदवी प्रदान केली. यामध्ये ३० पीएच.डी., ४४३३ पदव्युत्तर पदवी, ८५३ पदवी व १० पदविका प्रदान केल्या.

सोमनाथ एस., डॉ. मुजुमदार यांचा गौरव

यावेळी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष सोमनाथ एस. यांना त्यांच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आणि सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष तसेच सिम्बायोसिस इंटरनॅशनल अभिमत विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

SCROLL FOR NEXT