कोथरूड, ता. ३१ : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात मुक्तीच्या शिक्षणाचा विचार पसरवणारे समाजशास्त्रज्ञ डॉ. गी प्वॉत्व्हँ यांच्या स्मृतिदिनानिमित्त मणिपूरच्या सुभाषिनी नओरेम आणि शिरूर येथील लोकजागृती चळवळ यांना ‘डॉ. गी प्वॉत्व्हँ स्मृती चेतना पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. कोथरूड येथील गांधी भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमात लोकजागृती चळवळीच्या वतीने रवींद्र धनक यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. शाल आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या वेळी आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजित वैद्य, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अन्वर राजन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गरीब डोंगरी संघटनेच्या कुसुम सोनवणे होत्या. डॉ. वैद्य म्हणाले, ‘‘लोकशाही आणि समाजवादी राज्य उभारायचे असेल, तर डॉ. गी यांनी सुरू केलेली शिक्षण पद्धती रुजवायला हवी. भारतीय माणसाला सीमावर्ती भागातील नागरिक आपले वाटत नसतील, तर तो येथील व्यवस्थेतील मोठा दोष आहे. मणिपूर अजूनही अशांत आहे, कारण तेथे आग लावलेली आहे.’’
पुरस्काराला उत्तर देताना नओरेम यांनी हा पुरस्कार मोठा सन्मान असल्याचे सांगून मणिपूर व सीमावर्ती भागातील जनतेला मित्रत्वाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. धनक यांनी लोकजागृती चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम लोकसहभागातून सुरू असल्याचे सांगितले.
भाऊसाहेब वायदंडे यांनी डॉ. गी यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, ‘‘पोतराज असलेल्या माझ्यासारख्या युवकाला त्यांनी जटामुक्त केले. मानव मुक्तीचे हे काम पुढे नेण्याची गरज आहे. या प्रसंगी सीताराम बाजारे, पंडित पडळघरे, नमिता वाईकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जितेंद्र मैड यांनी केले.
कोथरूड : लोकजागृती चळवळीच्या वतीने डॉ. गी प्वॉत्व्हँ स्मृती चेतना पुरस्कार स्वीकारताना (डावीकडून) रवींद्र धनक, डॉ. अभिजित वैद्य, कुसुम सोनवणे आणि सुभाषिनी नओरेम.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.