पुणे

राजर्षी शाहू पुरस्कार वितरण कार्यक्रम

CD

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू पुरस्काराने ज्येष्ठ इतिहास संशोधक (कै.) डॉ. जयसिंगराव पवार यांचा मरणोत्तर सन्मान करण्‍यात आला. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या पत्नी वसुधा पवार. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवर.
--------
डॉ. जयसिंगराव पवारांनी इतिहासातील सत्याला न्याय दिला
खासदार शाहू महाराज : राजर्षी शाहू पुरस्काराने डॉ. जयसिंगराव पवार यांचा मरणोत्तर सन्मान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ : ज्येष्ठ इतिहास संशोधक (कै.) डॉ. जयसिंगराव पवार यांनी इतिहासातील सत्याला न्याय दिला, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. ‘खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे’ म्हणण्याची त्यांची निर्भीड भूमिका इतिहास संशोधनाला नवी दिशा देणारी ठरली, असेही ते म्हणाले.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे शाहू महाराज यांच्या हस्ते डॉ. पवार यांना मरणोत्तर ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ देण्यात आला. त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी तो स्वीकारला. एक लाख रुपये, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर अध्यक्षस्थानी होते. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला. खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘डॉ. पवार यांच्याशी माझा १९८५ पासून स्नेह होता. छत्रपती संभाजी महाराजांवरील ग्रंथ संपादित केला होता. तेथून आमचा वैचारिक संवाद सुरू झाला. त्यांनी इतिहासाची मांडणी पुराव्यांच्या आधारे केली. त्यांनी मराठ्यांचा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास असल्याचे अभ्यासपूर्ण लेखन करत ‘कोल्हापूर स्कूल ऑफ हिस्ट्री’ला नवी ओळख मिळवून दिली. त्यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा इतिहास समाजासमोर मांडण्याचे कार्य केले.’
------------
पुरस्काराची रक्कम सर्वोत्तम प्रबंधासाठी
डॉ. पवार यांनी संतुलित व मवाळ मनाने इतिहास उलगडला. स्वत:ला कर्णकर्कश संशोधक बनू दिले नाही. त्यांच्या लिखाणाचा स्वभावधर्म नेमस्त होता. पण बोटचेपा नव्हता, असे सांगत डॉ. मंजूश्री पवार यांनी पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्कम शिवाजी विद्यापीठातील मराठा इतिहासातील सर्वोत्तम प्रबंधासाठी देत असल्याची घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT