Pune  sakal
पुणे

Cyrus Poonawalla: सायरस पूनावाला यांना ‘भारतरत्न’ सन्मान द्यावा ; शरद पवार, स्व. डॉ. मोहन धारिया पुरस्कार प्रदान

‘जगातील प्रत्येक पाचपैकी तिसरे लहान मूल सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेली प्रतिबंधात्मक लस घेत आहे. कोरोना उद्रेकाची तीव्रता त्यांच्या लस उत्पादनामुळेच कमी करता आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘जगातील प्रत्येक पाचपैकी तिसरे लहान मूल सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेली प्रतिबंधात्मक लस घेत आहे. कोरोना उद्रेकाची तीव्रता त्यांच्या लस उत्पादनामुळेच कमी करता आली. त्यामुळे त्यांच्या कार्याचे योगदान लक्षात घेता त्यांना केवळ पद्मभूषण पुरस्कारापुरते मर्यादित न ठेवता केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे,’’ असे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बुधवारी येथे सांगितले.

वनराई फाउंडेशनतर्फे पवार यांच्या हस्ते डॉ. पूनावाला यांना ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, वनराईचे विश्वस्त गणपतराव पाटील, सचिव नीलेश खांडेकर, विश्वस्त रोहिदास मोरे, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘डॉ. मोहन धारिया यांनी राजकारण आणि समाजकारणाने देशाला वेगळी दिशा दाखवून दिली. राष्ट्र प्रथम ही मोहन धारिया यांची विचारसरणी होती. सिरम इन्स्टिट्यूट हे त्यांच्याच विचारांवर वाटचाल करून केवळ देशाचाच नव्हे तर जगातील प्रत्येकाचा विचार करून लस निर्मिती करत आहे.’’

डॉ. पूनावाला म्हणाले, ‘‘कपभर चहाच्या किमतीमध्ये लहान मुलांसाठी लस उपलब्ध करून देण्यात माझे कुटुंब आणि संस्थेचा मोठा वाटा आहे. तीन ते चाळीस वर्षांपूर्वी ही संस्था सुरू करताना त्यात डॉ. धारिया यांचे योगदान होते. त्यातून आज कोट्यवधी बालकांचे प्राण वाचत आहे, ही समाधानाची बाब आहे.’’

चव्हाण म्हणाले, ‘‘आतापर्यंत हा पुरस्कार राष्ट्र निर्मात्यांना दिला आहे. डॉ. पूनावाला यांना हा पुरस्कार प्रदान केल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे. डॉ. धारिया यांनी वनराई संस्थेच्या माध्यमातून विकासाला दिशा दिली. त्याचप्रमाणे डॉक्टर सायरस पूनावाला यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कामामुळे केवळ देशालाच नव्हे तर जगाला मोठ्या संकटातून दूर केले आहे.’’ डॉ. वेद प्रकाश मिश्रा, डॉ. गिरीश गांधी यांनीही मनोगत व्यक्त केले. रवींद्र धारिया यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सतीश देसाई यांनी सूत्रसंचालन केले. रोहिदास मोरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT