Dr. Nanasaheb Parulekar 126 jayanti nature lovers interview pune sakal
पुणे

Dr. Nanasaheb Parulekar : निसर्गयात्रींचा रोचक प्रवास आज उलगडणार

डॉ. नानासाहेब परुळेकर जयंतीनिमित्त विशेष परिसंवादाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशातील वन्यजीव संवर्धन, गिर्यारोहण क्षेत्रातील रोमांचकारी घटना आणि निसर्ग व पर्यावरण या क्षेत्रातील अभ्यासातून समोर आलेल्या विविध बाबी निसर्गयात्रींच्या माध्यमातून आज पुणेकरांना अनुभवता येणार आहेत.

‘सकाळ’चे संस्थापक संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त निसर्गयात्रींशी एका अनोख्या संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे, निसर्ग अभ्यासक भाऊ काटदरे, गिर्यारोहक उमेश झिरपे आपले अनुभवविश्‍व खुले करणार आहेत.

जल, जंगल आणि गिरीशिखरे या विषयावर बुधवारी (ता.२०) सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे ही मुलाखत रंगणार आहे. निसर्गाच्या सानिध्यातील त्यांचे रोमांचकारी अनुभव आणि निसर्ग संवर्धनाचा अनोखा प्रवास यावेळी उलगडेल.

या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार (कै.) ना. अ. पेंडसे पुरस्कृत डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कारांचे वितरण होईल. नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे करण्यात आले आहे.

भागवत, गोमासे आणि पाटील यांना डॉ. परुळेकर पुरस्कार

मुंबई विद्यापीठातील उपकुलसचिव भरती प्रक्रियेतील गैरप्रकार समोर आणणारे संजीव भागवत, नागपूर मध्यवर्ती कारागृहातील गांजा आणि मोबाईल रॅकेटचा पर्दाफाश करणारे वरिष्ठ बातमीदार मंगेश गोमासे आणि कोल्हापुरातील राजाराम हायस्कूलच्या स्थलांतराबद्दल सडेतोड भूमिका घेणारे सदानंद पाटील यांना यंदाचा ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

विविध विषयांवर आणि सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने लेखन करणाऱ्या ‘सकाळ समूहा’तील बातमीदारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. स्वातंत्र्यसैनिक व व ज्येष्ठ पत्रकार (कै) ना. अ. पेंडसे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार देण्यात येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 मिळतोय निम्म्या किंमतीत! ४४ हजारात खरेदीसाठी रांगा; कुठे सुरुय ही अजब ऑफर? पाहा एका क्लिकवर

Solapur Hyderabad Flight : सोलापूरकरांसाठी गूड न्यूज! 17 एप्रिलपासून विमान प्रवासाचं गणित बदलणार; पहा नवीन वेळापत्रक

'कमळी' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री; म्युझिक टिचर बनून येतेय सगळ्यांना वेड लावणारी गायिका, चाहते खुश

Yuvraj Singh: 'धोनी अचानक आला, भारताचा कॅप्टन झाला, त्यावेळी मी...', युवराजचं थेट भाष्य; निवृत्तीबाबतही केला धक्कादायक खुलासा

Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

SCROLL FOR NEXT