Dr Narendra Dabholkars killer gets arrested
Dr Narendra Dabholkars killer gets arrested 
पुणे

डॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच वर्षांनंतर छडा

सकाळवृत्तसेवा

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश आले. याप्रकरणी मुख्य संशयिताला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात देण्यात आले. याशिवाय एटीएसने स्फोटकांच्या साठ्यासह अटक केलेल्या कळसकरचाही याप्रकरणी सहभाग पुढे आला आहे. 

सचिन प्रकाशराव अंदुरे असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी आहे. त्यानेच दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. अंदुरेला सीबीआयकडे सुपूर्त करण्यात आले असून, त्यांनी याप्रकरणी त्याला अटक केली आहे. 20 ऑगस्ट 2013 ला डॉ. नरेंद्र दाभोलकर पुण्यातील ओंकारेश्‍वर मंदिराजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेले असता दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी दाभोलकर यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. हा गोळीबार अंदुरेने केला होता. या दोघांनी हत्येसाठी एका दुचाकीचा वापर केला होता. स्फोटकांप्रकरणी कळसकर याची कोठडी 28 ऑगस्टपर्यंत "एटीएस'कडे आहे. त्यामुळे त्यानंतर त्याचा ताबा सीबीआयला देण्यात येणार आहे. 

स्फोटकांप्रकरणी "एटीएस'ने गेल्या आठवड्यात वैभव सुभाष राऊत, शरद भाऊसाहेब कळसकर आणि सुधन्वा सुधीर गोंधळेकर यांना अटक केली होती. आरोपींकडून अनेक शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली होती. यातूनच कळसकर याचा दाभोलकर हत्या प्रकरणातील सहभाग पुढे आल्यानंतर त्याच्या माहितीवरून अंदुरेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला सीबीआयच्या स्वाधीन करण्यात आले. 

"पाच वर्षांच्या कालखंडानंतर आजची ही कारवाई मोठी आणि महत्त्वाची मानावी लागेल. सीबीआयने केलेल्या विरेंद्र तावडेच्या पहिल्या अटकेला जवळपास दोन वर्षे झाल्यानंतर ही कारवाई झाली आहे. यामुळे आता सीबीआय या गुन्ह्याची सर्व पाळमुळं खणून काढेल, अशी आशा आहे.'' 
- हमीद दाभोलकर 

याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. डॉ. विनोद तावडे यांना अटक झाल्यानंतर गेल्या अडीच वर्षांत एकही अटक झाली नव्हती. या अटकेमुळे तपास यंत्रणा, डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांची हत्या घडवून आणणाऱ्या सूत्रधारांपर्यंत पोचतील, असा विश्‍वास निर्माण झाला आहे. 
- मुक्ता दाभोलकर 

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी तपासातील महत्त्वाचा घटनाक्रम : 
* 2013 
20 ऑगस्ट ः डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या 
गुन्हे शाखेची तपास पथके रवाना, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात 
22 ऑगस्ट ः घटनास्थळावरील पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले 
23 ऑगस्ट ः पोलिस ठाण्यांच्या पातळीवर तपास पथके 
25 ऑगस्ट ः भोंदूबाबा, बनावट डॉक्‍टर, ज्योतिषी यांची चौकशी सुरू 
26 ऑगस्ट ः तत्कालीन एटीएस प्रमुख आणि पुणे पोलिसांची एकत्रित बैठक 
27 ऑगस्ट ः मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना तपासाबाबत सूचना 
28 ऑगस्ट ः दुचाकींच्या नंबरप्लेट, सराईत आणि पॅरोलवरील गुन्हेगारांची चौकशी सुरू 
29 ऑगस्ट ः सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासणीसाठी मुंबई आणि तेथून लंडनला 
29 ऑगस्ट ः गोव्यातील आश्रमातून एक साधक ताब्यात 
30 ऑगस्ट ः सुमारे आठ कोटी फोन कॉलसह ई-मेलची तपासणी सुरू 
2 सप्टेंबर ः संशयितांचे रेखाचित्र तयार, बॅलेस्टिक अहवाल पोलिसांना प्राप्त 
6 सप्टेंबर ः रेखाचित्राशी साधर्म्य असलेल्या 17 जणांची चौकशी 
19 डिसेंबर ः मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांना कोठडी 

* 2014 
16 जानेवारी ः गुन्हे शाखेकडून नव्याने तपास सुरू 
13 मार्च ः नागोरी आणि खंडेलवालची प्रत्यक्षदर्शींकडून ओळखपरेड 
3 एप्रिल ः विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना 
9 मे ः गुन्हे शाखेकडून तपास सीबीआयकडे सोपविला 
3 जून ः तपासाची कागदपत्रे सीबीआयच्या ताब्यात 
6 जून ः सीबीआय अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी 
19 ऑगस्ट ः गुन्हेगार अद्याप फरारीच 
15 नोव्हेंबर ः दाभोलकर हत्या प्रकरणाच्या चौकशीत गांभीर्याने लक्ष घालण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन 

* 2015 
2 ऑगस्ट ः तपासाबाबत अंनिसचे राष्ट्रपतींना पत्र 
21 नोव्हेंबर ः मारेकऱ्यांचे रेखाचित्र पुन्हा एकदा प्रसिद्ध 
3 डिसेंबर ः डॉ. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्येचा परस्परांशी संबंध नाही - गृह राज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती 

* 2016 
17 फेब्रुवारी ः "सनातन'चे साधक नीलेश शिंदे, हेमंत शिंदेच्या न्यायवैद्यक चाचणीस (पॉलिग्राफ टेस्ट) न्यायालयाची मंजुरी 
31 मे ः सीबीआयचे वीरेंद्र तावडे (पनवेल) व सारंग अकोलकर (पुणे) यांच्या घरी छापे 
4 जून ः सीबीआय तपासासाठी लंडनच्या स्कॉटलंड यार्डची मदत घेण्याबाबत चर्चा 
14 जून ः वीरेंद्र तावडे हाच मुख्य सूत्रधार असल्याचा सीबीआयचा न्यायालयात दावा 
16 जून ः मडगाव स्फोट, मिरज दंगलीत तावडेचा हात 
18 जून ः मारेकऱ्यांना पोलिस अधिकाऱ्याने प्रशिक्षण दिल्याची चर्चा 
18 जून ः दहशतवाद विरोध पथकाचा (एटीएस) कोल्हापुरातील 13 जणांवर "वॉच' 

* 2017 
1 मार्च ः मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास सीबीआय व मुंबई गुन्हे शाखेतर्फे पाच लाखांचे बक्षीस जाहीर 
20 मे ः तपासासाठी स्पेशल टास्क फोर्स नेमण्याची "अंनिस'ची मागणी 
5 ऑक्‍टोबर ः न्यायालयाने वीरेंद्र तावडे याचा जामीन अर्ज फेटाळला 

* 2018 
21 मे ः पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या अमोल काळेसह पाच जणांना कर्नाटक "एसआयटी'कडून अटक 
30 जून ः अमोल काळे याच्याकडील डायरी जप्त, डायरीत वैभव राऊतचा उल्लेख, कर्नाटक-महाराष्ट्रातील लेखक, विचारवंतांसह 36 जण "हिट लिस्ट'वर. 
6 जुलै ः न्यायालयाने वीरेंद्र तावडेचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला 
10 ऑगस्ट ः अमोल काळेच्या डायरीनुसार मुंबईतून वैभव राऊतसह सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर यांना अटक 
11 ऑगस्ट ः राऊतसह दोघांचा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येच्या प्रकरणात समावेश असल्याचा पोलिसांना संशय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT