पुणे

डॉ. संदीपान नरोटे यांची ‘आयईआय’ला भेट

CD

पुणे, ता. २७ : राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषदेचे (एनसीव्हीईटी) संचालक डॉ. संदीपान पी. नरोटे यांनी दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), पुणे लोकल सेंटरला भेट दिली. डॉ. गिरीश मुंदडा आणि ‘आयईआय’चे अध्यक्ष काटे यांच्या पुढाकारातून या भेटीचे आयोजन केले होते. या वेळी डॉ. नरोटे यांनी शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्प्यांची माहिती दिली. सिंहगड महाविद्यालयात १२ वर्षे आणि वाडिया महाविद्यालयात दोन वर्षे केलेल्या कार्याचा आढावा घेत त्यांनी पॉलिटेक्निक शिक्षण व शासकीय तांत्रिक शिक्षण व्यवस्थेतील योगदान स्पष्ट केले. या प्रवासात मार्गदर्शक, सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य मोलाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. नरोटे यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘एनसीव्हीईटी’मधील नियुक्ती आणि निवड प्रक्रियेविषयीही त्यांनी माहिती दिली. उद्योगांच्या गरजांनुसार व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास आणि प्रमाणित अभ्यासक्रम राबविण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यामुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढण्यास आणि उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित होण्यास मदत होते, असे ते म्हणाले. या वेळी ‘आयईआय’ पुणे लोकल सेंटरचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय बोरमणे आणि मानद सचिव हर्षवर्धन देवकाते यांच्या हस्ते डॉ. नरोटे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. डी. जी. भालके यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JIO IPO : १० लाख कोटींहून अधिक मूल्यांकनाचा देशातील पहिलाच महा-आयपीओ; ३० लाख कोटींच्या ऐतिहासिक टप्प्याकडे रिलायन्सची वाटचाल

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

Uruli Kanchan Crime : विवाहित महिलेला 'तुमचे पार्सल आले आहे' असा बनाव रचून फोन करायचा, तिच्याशी अश्लील बोलून एकांतात भेटण्याची मागणी करणाऱ्या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : तहसीलदारांची महागाव बँकेत धडक पीक कर्ज प्रकरणांवरून शाखा व्यवस्थापकाची झाडाझडती

Ayodhya Deepotsav 2026 : अयोध्येचा दीपोत्सव कसा बनला जागतिक आकर्षण? योगी आदित्यनाथ यांनी सांगितले महत्त्व

SCROLL FOR NEXT