Dr. NM Joshi says that the movement to donate to the reservation community should be start sakal
पुणे

आरक्षण समाजालाच दान करण्याची चळवळ सुरु झाली पाहिजे - डॉ.न.म.जोशी

ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ. न.म.जोशी यांनी मांडला विचार

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : “मागील ७५ वर्षात आरक्षणाचे फायदे मिळाले असतील. त्यांच्या एक- दोन पिढ्या क्रिमिलेयरपर्यंत पोचल्या असतील. ते समाजात सुस्थापित झाले. त्यांनी आता असा विचार करावा. आम्हाला समाजाने आरक्षण (reservation) दिले. आता आम्ही आरक्षण समाजालाच दान करून टाकतो. याला क्रिमिलेयरचा कायदा(Criminal law) नसावा. कायद्याने काही होत नाही. माणसाला आतून वाटले पाहिजे. आतून वाटण्याची सकारात्मक चळवळ सुरु झाली पाहिजे. वंचितांची हि रेष पुसली जाईल. सगळ्यांना न्याय मिळेल. प्रबोधनाची चळवळीबाबत डॉ.रावसाहेब कसबे यांनी पुढाकार घ्यावा. त्यावर त्यांनी विचार मांडावेत.” असा विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ. न.म.जोशी यांनी मांडला.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या २१व्या संमेलनात आज रविवारी 'वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्कारा'चे वितरण ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ. न.म.जोशी यांच्या हस्ते केले. त्यावेळी ते बोलत होते. साहित्य क्षेत्रासाठी ज्येष्ठ लेखक साहित्यिक डॉ.रावसाहेब कसबे यांना तर कला क्षेत्रासाठीचा पुरस्कार प्रसिद्ध नाट्य- सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना दिला. रोख रूपये अकरा हजार आणि सन्मानचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे. गरवारे उद्योग समुहाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. श्रीधर राजपाठक व मकरंद पाचडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे व्यासपीठावर उपस्थित होते.

सध्याची परिस्थिती राजकारण व जातीशी निगडीत आहे. विविध कारणांनी जाती जास्त घट्ट झाल्या. हे कधी नाहीसे होणार, काहीजण म्हणतात आरक्षणाने. नुसते आरक्षण देऊन उपाय नाही. माझ्या मते आरक्षण असलेच पाहिजे. शेवटच्या वंचितापर्यंत समाजाकडून त्याच्या तोंडात घास देण्याची जबाबदारी आपली आहे. असे सांगून डॉ. न.म.जोशी म्हणाले, राष्ट्रभक्ती, समाजभक्ती आणि सामाजिक जाणीव जागरूक असणे गरजेचे आहे. सध्याचे आपले सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवन ढवळून निघाले आहे. आपले समाजजीवन अनेक प्रश्नांनी व्यापले आहे. सांस्कृतिक जीवनातील कोरोनासाठी डॉ.रावसाहेब कसबे यांच्या सारख्या विचारवंतांचे विचार आणि दिलीप प्रभावळकर यांच्यासारख्या अभिनेत्याची कला यांचा उपयोग करण्याची गरज आहे. त्यांचे विचार आणि कला याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.

डॉ. कसबे म्हणाले, जगातील अनेक देशांत क्रांती झाली. त्यात सर्वात पुढे साहित्यिक आणि कलावंत होते. आपल्या देशाचे समाजकारण, समाजाची एकात्मता टिकवली पाहिजे. त्यासाठी साहित्यिक आणि कलावंतांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. देशाचे सुशासन आणि समाजाची एकात्मता टिकविण्यासाठी साहित्यिक आणि कलावंत पुढे आले. तर भारतीय राजकारणी देखील सुसंस्कृत बनू शकतात, हे आपण दाखवून देऊ शकतो.

प्रभावळकर यांनी हि मनोगत व्यक्त केले. डॉ.राजपाठक यांनी 'वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्कार' प्रायोजित करण्यामागील भूमिका विशद केली. दिलीप बराटे यांनी सांगितले की, पुढील वर्षी या संमेलनात विविध वाङ्मय प्रकारात पुरस्कार देणार आहे. यावेळी शरद जतकर यांच्या 'द मिस्ट्री ऑफ डिमेटर' पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. ग्रंथ प्रदर्शन शब्दांगणचे लक्ष्मण राठीवडेकर यांचा विशेष सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि.दा. पिंगळे यांनी केले. आभार राजेंद्र वाघ यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT