Dr Pradip Pardeshi
Dr Pradip Pardeshi Sakal
पुणे

शिरूरकर डॉक्टर सातासमुद्रापार जाऊन करताहेत कोरोना रुग्णांची सेवा

सकाळ वृत्तसेवा

शिरूर - कोरोनाशी (Corona) लढताना प्रत्येक जण आपल्या परीने योगदान देत असताना, ग्रामीण मातीत वाढलेले, स्थानिक शिक्षण पद्धतीत घडलेले येथील डॉ. प्रदीप परदेशी (Dr Pradip Pardeshi) सातासमुद्रापार जाऊन कोरोनाग्रस्तांना या महामारीतून वाचविण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. गेल्या वर्षभराच्या काळात डॉ. परदेशी यांनी आपल्या टीमच्या सहकार्याने लंडन (London) व परिसरातील सुमारे दोन हजार रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. (Dr Pradip Pardeshi Corona Patient Treatment London Humanity)

शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव तु. म. परदेशी व कुसुमबाई यांचे चिरंजीव असलेले डॉ. प्रदीप यांचे प्राथमिक शिक्षण नगर परिषदेच्या शाळेत; तर माध्यमिक शिक्षण येथील विद्याधाम प्रशालेत झाले. उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला जाऊन वैद्यकीय ज्ञान संपादन केल्यानंतर, वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने ते तेथेच वास्तव्यास राहिले. सन २००५ पासून लंडन येथील सेंट हेलियर हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागात ते कार्यरत आहेत.

कोरोनाने जग व्यापले, तसाच हलकल्लोळ लंडनमध्येही झाला. त्यावेळी सेंट हेलियर हॉस्पिटलमध्ये तातडीने कोविड विभाग सुरू करण्यात आला. एकशे साठ बेडच्या या कोविड विभागाची जबाबदारी फेब्रुवारी २०२० पासून डॉ. प्रदीप यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य पथकावर सोपविण्यात आली असून, हे पथक रुग्णांना कोरोनातून वाचविण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करीत आहे. गेल्या वर्षभरात येथून दोन हजाराहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, त्या परिसरातील इतर हॉस्पिटलच्या तुलनेत ‘सेंट हेलियर’ची कोरोनावरील मात अव्वल ठरली आहे. इंग्लंडमध्ये, ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वतीने सर्व हॉस्पिटलच्या कोरोना काळातील कार्याचे मूल्यमापन केले असता, सेंट हेलियर हॉस्पिटलला प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे. ‘कोविडच्या जागतिक महामारीचा सामना करताना मी व माझ्या पथकातील सर्व डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी यांनी लावलेल्या ज्ञानाच्या कसोटीची; तसेच ध्येय आणि जिद्दीने केलेल्या कार्याची ही पोचपावती आहे,’’ अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘सकाळ’ शी बोलताना व्यक्त केली.

त्यांचे थोरले बंधू डॉ. संदीप परदेशी यांनीही शिरूर शहर व परिसरातील सुमारे एक हजार सातशे रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. यामध्ये त्यांनी महागडी औषधे, दुर्मीळ ठरलेली इंजेक्‍शन, गोळ्या रुग्णांना देणे जाणीवपूर्वक टाळले आहे. डॉ. प्रदीप यांच्या पत्नी डॉ. रचना या स्त्रीरोगतज्ज्ञ असून, त्यादेखील लंडन येथेच प्रॅक्‍टिस करतात.

आरोग्यपूर्ण जीवनशैलीने कोरोनावर मात

सुरवातीच्या टप्प्यात कोरोनाबाबत कमालीची भीती असताना, लंडनमध्येही तेच चित्र होते. तेथेही वैद्यकीय साधने व औषधांचा तुटवडा होता. अशा स्थितीत सातत्याने कोरोनाग्रस्तांसमवेत वावरल्याने डॉ. प्रदीप परदेशी यांनाही कोरोनाने गाठले. तथापि, योग्य जीवनशैली, औषधोपचार व सकारात्मक विचारधारा आणि इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी कोरोनावर मात केली. त्या वेळी भीती व काळजीपोटी कुटुंबीयांनी त्यांना सर्व सोडून शिरूरला येण्याविषयी खूप आग्रह धरला. तथापि, कुटुंबीयांचा आग्रह त्यांनी नम्रपणे टाळला व बरे झाल्यानंतर तातडीने पुन्हा रुग्णसेवेत दाखल झाले. कोरोनाग्रस्तांच्या सेवेत कार्यरत असल्याने त्यांना गेल्या वर्षभरात शिरूरलाही येता आले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT