Pune-Police 
पुणे

Lockdown : केंद्रीय गृहमंत्रालयाचा 'तो' आदेश पुण्यात लागू होणार नाही; पोलिस सहआयुक्तांचे स्पष्टीकरण!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय गृहमंत्रालयाने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणी दुकाने उघडी करण्यास सांगितले आहे; परंतु पुणे हे कोरोना प्रादुर्भावबाबत 'रेड झोन'मध्ये येत असल्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार, पुण्यात दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी नाही, अशी माहिती सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने संचारबंदी कालावधीत २४ एप्रिलला दुकाने उघडी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यांनतर गृह मंत्रालयाने प्रसिद्धीप्रकाद्वारे दुकाने उघडी ठेवण्याची दिलेली सवलत ही राज्य सरकारने जाहीर केलेल्या संक्रमणशील क्षेत्रात लागू होणार नाही असे स्पष्ट केले आहे.

पुणे शहरातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुण्याचा समावेश रेड झोनमध्ये म्हणजे संक्रमणशिल क्षेत्रात केला आहे. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेले परिपत्रक पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लागू होणार नाही, तसेच यापूर्वी दिलेले सर्व मनाई आदेश पुढील काळात ही कायम राहतील, असेही डॉ. शिसवे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT