‘वर्ल्ड एक्सलन्स बुक’मध्ये डॉ. अकोलकर
ऑलिंपिक समिती, फिफा विश्वचषकात महत्त्वपूर्ण सेवा देण्याच्या कार्याची घेतली दखल
आसू, ता. १७ : फलटण- बारामती परिसरातील प्रख्यात फिजिओथेरपिस्ट डॉ. रोहन अकोलकर यांची ‘वर्ल्ड एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये गौरवपूर्ण नोंद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती आणि फिफा वर्ल्ड कपमध्ये महत्त्वपूर्ण सेवा देणारे ते भारतातील पहिले आणि एकमेव फिजिओथेरपिस्ट ठरले आहेत. भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे मुख्यालय असलेल्या लंडन येथे डॉ. अलेस्सांद्रो जार्ज यांच्या हस्ते डॉ. रोहन अकोलकर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
डॉ. अकोलकर यांनी अनेक प्रतिष्ठेच्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये आपली छाप उमटवली आहे. त्यांनी फिफा वर्ल्ड कप (फुटबॉल) २०१८ आणि २०२२ मध्ये अधिकृत फिजिओथेरपिस्ट म्हणून जबाबदारी सांभाळली. पॅरिस ऑलिंपिकमध्ये ऑन-फिल्ड फिजिओथेरपिस्ट म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली. त्यांना लॉस एंजेलिस ऑलिंपिक २०२८ च्या आगामी ऑलिंपिक स्पर्धेसाठी तज्ज्ञ म्हणून विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.
क्रीडा क्षेत्रासह सामाजिक बांधिलकी म्हणून डॉ. अकोलकर यांच्या मानवतावादी कार्याचीही दखल या विक्रमात घेण्यात आली आहे. ते एलिट खेळाडूंसोबतच शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींच्या उपचारांसाठीही नेहमीच तत्पर आहेत. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘द अचिव्हर्स - लेजेंड्स ऑफ इंडिया’मध्ये स्थान मिळाले असून, २५ जानेवारी २६ रोजी त्यांना या अधिकृत प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची ‘वर्ल्ड एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
......................................
फोटो :...........02509
लंडन : ऑलिंपिक समितीच्या मुख्यालयात डॉ. अलेस्सांद्रो जार्ज यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारताना डॉ. रोहन अकोलकर.
...................................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.