टिळक रस्ता - ‘महाराष्ट्राचा समग्र इतिहास, खंड- १ या ग्रंथाचे पूजनप्रसंगी (डावीकडून) प्रा. मोहिनी कारंडे, डॉ. कीर्ती मुळीक, डॉ. दिलीप शेठ, डॉ. सदानंद मोरे, श्रद्धा कुंभोजकर.
टिळक रस्ता - ‘महाराष्ट्राचा समग्र इतिहास, खंड- १ या ग्रंथाचे पूजनप्रसंगी (डावीकडून) प्रा. मोहिनी कारंडे, डॉ. कीर्ती मुळीक, डॉ. दिलीप शेठ, डॉ. सदानंद मोरे, श्रद्धा कुंभोजकर. 
पुणे

इतिहासाचा बहुआयामी अभ्यास गरजेचा - डॉ. सदानंद मोरे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - इतिहास हीच आंतरविद्याशाखीय ज्ञानशाखा आहे. इतिहासाचा बहुआयामी अभ्यास गरजेचा आहे. एखाद्या घटनेमागची राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पार्श्‍वभूमी तसेच मानसशास्त्र, भूगोल समजावून घेणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक सोपान शेंडे लिखित ‘महाराष्ट्राचा समग्र इतिहास खंड-१’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ, पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख श्रद्धा कुंभोजकर, मोहिनी कारंडे, डॉ. कीर्ती मुळीक उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, ‘‘इतिहासाचा अभ्यास करत असताना भूतकाळातील घटनांचा अभ्यास करावा लागतो. ते इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने अवघड काम असते. या पुस्तकाला अनेक कालखंडाचा स्पर्श झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर या पुस्तकात आहेच. शिवाय महाराष्ट्राच्या सामाजिक बाबींचा समावेशदेखील असल्याचे दिसून येते.’’ 

या वेळी डॉ. मोरे यांनी पुस्तकातील पुतळे आणि शिल्पकार यांचा संदर्भ देत राज्यातील पुतळ्यांचे राजकारण तसेच तत्कालीन परिस्थितीतील वेगवेगळ्या वादासंदर्भात माहिती 
दिली. 

वर्तमानासाठी नेहमी इतिहासाचा अभ्यास व त्याची माहिती समजून घेणे आवश्‍यक असते. त्यामुळे इतिहास हा वेगवेगळ्या प्रकारचा असून त्या विविधतेचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो, असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. शेठ यांचे भाषण झाले. राहुल मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT