पुणे

आदर्श प्राचार्य पुरस्काराने डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांचा सन्मान

CD

डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांचा आदर्श प्राचार्य पुरस्काराने सन्मान

सातारा, ता. ७ ः रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांना त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक, प्रशासकीय, साहित्यिक व सामाजिक कार्याची दखल घेत आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुणे येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयात झालेल्या लोकशिक्षक बाबा भारती पुरस्कार वितरण सोहळ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या वेळी भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. अशोककुमार पगारिया, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मेनकुदळे हे रयत शिक्षण संस्थेत तीन दशकांहून अधिक काळ अध्यापनाचे कार्य करीत असून, मराठी विषयाचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. अध्यापनाबरोबरच त्यांनी साहित्य, संशोधन, प्रबोधन आणि प्रशासन या क्षेत्रांतही भरीव योगदान दिले आहे. त्यांनी आजवर शेकडो व्याख्याने दिली असून, २० पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन केले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

W55731
पिंपरी (पुणे) ः डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी प्रा. डॉ. सविता मेनकुदळे, डॉ. अशोककुमार पगारिया, महेंद्र भारती, प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

IND vs WI 2nd T20I: नितीश रेड्डी, प्रिन्स यादव IN, वैभव सूर्यवंशी बाकावरच; दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी Playing XI मध्ये सूचवला बदल

Sangli District Bank Election : आमदार सुरेश खाडेंसह सात जणांचे अर्ज बाद; पडळकर, विशाल पाटील, देशमुख यांना दिलासा, 21 जागांसाठी 295 अर्ज

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल - राहुल गांधी

थिएटर फुटलं, अंधारातून पळालो, नानाने मला रिक्षात टाकलं अन् स्वतः... अशोक मामांनी सांगितला तो प्रसंग, काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT